घरताज्या घडामोडीराज्यपालांनी १२ आमदार ठेवलेत मांडी खाली दाबून - संजय राऊत

राज्यपालांनी १२ आमदार ठेवलेत मांडी खाली दाबून – संजय राऊत

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी १२ राज्यपाल नियुक्त आमदारांवरून राज्यपालांना टोला लगावला

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. काल (सोमवार) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्यांच दिवशी पुन्हा एकदा राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आज याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘राज्यपालांनी मांडी खाली १२ आमदार दाबून ठेवले आहेत, ते मोकळे करावे.’

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

‘आमचे राज्यपाल करुणेचे सागर आहेत. महाराष्ट्र हा देवांचा, संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम महाराष्ट्रातून झाला आहे. म्हणून बहुतेक राज्यपालांना महाराष्ट्र रमावसं वाटतंय. त्याच करुणेच्या भावनेनं त्यांना कायद्यावर आणि घटनेवर करुणा दाखवावी. जे १२ राज्यपालनियुक्त आमदार त्यांनी त्यांच्या मांडी खाली दाबून ठेवले आहेत, ते मोकळे करावे. म्हणजे राज्यपालाच्या मनात घटनेविषयी करुणा आहे, हे देशाला समजेल. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याला देखील शांतता लागेल,’ असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणे नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जात आहे, असा नाराजीचा सूर आळवत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत विचारणा केली असता संजय राऊत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री याला उत्तर देतील.’


हेही वाचा – Maharashtra Budget Session Live Updates: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणी आखणीन भर

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -