मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात; २ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात; २ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सोमवारी दोन वेगवेगळे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. पहिला अपघात कामशेत पिंपोळी गावच्या हद्दीत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनवर अपघात झाला. ट्रक आणि महिंद्रा झायलो गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीत मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. झायलो गाडीतील सर्व जण मुंबईकडे येत होते.

दुसरा अपघात कामशेत बोगद्याजवळ झाला. मुंबईवरुन पुण्याकडे येणाऱ्या कारला अपघात झाला. कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला जाऊन धडकली. या अपघातामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही अपघातामध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अपघातातील मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. कामशेत पोलिसांकडून या दोन्ही अपघातांचा तपास सुरु आहे.

हेही वाचा – 

पुण्यातील अपघातात २ ठार, २ जखमी

First Published on: December 3, 2018 12:27 PM
Exit mobile version