घरमहाराष्ट्रपुण्यातील अपघातात २ ठार, २ जखमी

पुण्यातील अपघातात २ ठार, २ जखमी

Subscribe

पुण्यात झालेल्या कार अपघातात दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

पुण्यातील कार अपघातामध्ये दोन जण ठार तर, दोन जण जखमी झाले आहेत. ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणारी भरधाव कार डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. या भीषण अपघातामध्ये दोन तरूणांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले आहेत. गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. प्रतिक शेट्टीवार वय वर्षे २९ आणि राहुल नायर वय वर्षे २८ या अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावं आहेत. राहुल आणि प्रतिक हे मुळचे केरळचे आहेत. ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. भरधाव वेगानं धावणाऱ्या कारवरील चालकांचं नियंत्रण सुटलं आणि कार टेम्पोवर आदळली. त्यानंतर कार इतर वाहनांना धडकली. यामध्ये कारमधील दोन जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या साऱ्या प्रकरणामध्ये सध्या पोलिस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -