संगमनेरात आणखी दोन महिलांना कोरोनाची बाधा

संगमनेरात आणखी दोन महिलांना कोरोनाची बाधा

नाशकात आणखी दोघांचा मृत्यू

शहरातील रहेमतनगरमधील बाधिताच्या पत्नीला तर नाशिकमध्ये उपचार घेत असलेल्या बाधिताच्या आईला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोना संगमनेरकरांची पाठ सोडायला तयार नाही. जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित आणि मृत्यू झालेल्यांची संगमनेरात असल्याने संगमनेर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.

नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ४८ पैकी ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ते बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. तीन बाधितांत संगमनेर शहरातील रहेमतनगरमधील बाधित व्यक्तीची पत्नी, नगर शहरातील जुना मंगळवार बाजारातील रिक्षाचालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर यापुर्वी उपचार घेत असलेल्या सुभेदार वस्ती येथील महिलेचा दहा दिवसांनंतरचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला. या पाठोपाठ गुरुवारी सकाळी नाशिकचेदेखील अहवाल येऊन धडकले आहेत. यात निमोण येथील बाधित रुग्णावर नाशिकमध्ये उपचार सुरु असून त्याच्या आईलादेखील कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला.

निमाेण आणि धांदरफळमधील प्रत्येकी एकेका बाधिताचा मृत्यू झाला असून धांदरफळमधील सात बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन यापुर्वीच घरी सोडण्यात आले. तर त्यापाठोपाठ निमोण येथे आढळलेल्या रुग्णाचा अहवाल येण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या परिसरातील एका व्यक्तीला नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांच्या आईलादेखील करोना झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे निमोणमधील रुग्ण संख्या तीन झाली. नगर जिल्ह्यामधील बाधित रुग्णांची संख्या ६८ झाली आहे.

First Published on: May 21, 2020 1:43 PM
Exit mobile version