रत्नागिरीमधील दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 25 प्रवासी जखमी

रत्नागिरीमधील दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 25 प्रवासी जखमी

रत्नागिरी(ratnagiri) जिल्ह्यातील दापोली(dapoli) मध्ये दोन एसटी बस(st bgus) समोरासमोर धडकल्याची घटना घडली आहे. एसटी बसच्या या धडकेत एकूण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर या बसच्या धडकीत बस चालक गंभीर जखमी झाला आहे. तर इतर जखमी झालेल्या प्रवाशांवर दापोली(dapoli) उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरु आहेत. जखमी झालेल्या बस मधील प्रवाशांमध्ये महिलांचा आणि विद्यार्ध्यांचा सुद्धा समावेश आहे.

ही एसटी बस मुंबई – बोरिवली कडून दापोलीकडे येत(mumbai – bolivali st bus) असताना हा अपघात झाला. दापोलीकडून मुरतपूरकडे जाणाऱ्या या दोन एसटी बसचा मौजे दापोली वळणावर दुर्दैवी अपघात झाला. या दोन्ही बस समोरासमोर धडकल्याने बसचे स्टेअरिंग लॉक झाले आणि हा गंभीर अपघात झाला. (Two ST buses collide head-on at Dapoli in Ratnagiri; 25 passengers injured)

 


हे ही वाचा – पेणमधून देश-विदेशात लाखो मूर्ती रवाना

First Published on: August 25, 2022 10:27 AM
Exit mobile version