हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का?, उदय सामंतांचा ट्वीटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल

हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का?, उदय सामंतांचा ट्वीटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपालांनंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत विधानं केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेध आंदोलन केलं होतं. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक जुना फोटो शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा शाधला आहे. हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का?, असा सवाल उदय सामंत यांनी ट्वीटद्वारे उपस्थित केला.

काय म्हणाले उदय सामंत ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना… आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन करून आले आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर गुवाहाटी दौऱ्यानंतर शिंदे गटाने महाराष्ट्रात येऊन सत्ता स्थापन केली होती. आता पुन्हा शिंदे गट गुवाहाटीला जाऊन आल्याने उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काल या दौऱ्याबाबत तुफान फटकेबाजी केली. तसंच, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांचा उल्लेख रेडे असा केला होता. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं.

पाच महिन्यांपूर्वी आम्ही चाळीस आमदार “वाघ” होतो.. आम्ही उठाव केला मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.. त्यानंतर आम्ही “रेडा” झालो. किती ती चिडचिड.. “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे यमाचं वाहन आहे”, असं उदय सामंत म्हणाले.


हेही वाचा : रेडा तर यमाचं वाहन, उदय सामंतांचा ठाकरे आणि राऊतांवर


 

First Published on: November 27, 2022 6:59 PM
Exit mobile version