घरमहाराष्ट्ररेडा तर यमाचं वाहन, उदय सामंतांचा ठाकरे आणि राऊतांवर पलटवार

रेडा तर यमाचं वाहन, उदय सामंतांचा ठाकरे आणि राऊतांवर पलटवार

Subscribe

कोकणातील कट्टर शिवसैनिक असलेल्या उदय सामंत यांनीच या दोघांना पलटवार केला आहे. त्यांनी नुकतंच एक ट्विट करत उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं.

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत ४० आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन करून आले आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर गुवाहाटी दौऱ्यानंतर शिंदे गटाने महाराष्ट्रात येऊन सत्ता स्थापन केली होती. आता पुन्हा शिंदे गट गुवाहाटीला जाऊन आल्याने उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काल या दौऱ्याबाबत तुफान फटकेबाजी केली. तसंच, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांचा उल्लेख रेडे असा केला होता. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रेडा हे यामचं वाहन आहे, असा टोला उदय सामंत यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

- Advertisement -

पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. ही भूमी राष्ट्रमाता जिजाऊंची भूमी आहे. ज्या राष्ट्रमाताने आम्हाला छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा दिला. त्या भूमीत गद्दारीची बीजं रोवली गेली आहेत. ही कायमची उखडून फेकण्यासाठी या मशाली पेटलेल्या आहेत. या संतांच्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले आणि आता मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता.

हेही वाचा – ..म्हणून मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला, खासदार संजय राऊतांनी सांगितलं ‘कारण’

- Advertisement -

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेलेत. रेडे मी नाही म्हटलेलं. त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी म्हटलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.


उदय सामंत यांचं प्रत्युत्तर काय?

उद्धव ठाकरे काल विदर्भ दौऱ्यावर होते. चिखलीत ठाकरेंचा शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. मात्र, अशावेळी शिंदे गटातील आमदारही गप्प बसलेले नाही. कोकणातील कट्टर शिवसैनिक असलेल्या उदय सामंत यांनीच या दोघांना पलटवार केला आहे. त्यांनी नुकतंच एक ट्विट करत उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं.

पाच महिन्यांपूर्वी आम्ही चाळीस आमदार “वाघ” होतो.. आम्ही उठाव केला मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.. त्यानंतर आम्ही “रेडा” झालो. किती ती चिडचिड.. “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे यमाचं वाहन आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -