उदयनराजेंचे ‘भीक मागो आंदोलन’; म्हणे…पैसे खाणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले असते

उदयनराजेंचे ‘भीक मागो आंदोलन’; म्हणे…पैसे खाणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले असते

Lokdown विरोधात उदयनराजेंचे साताऱ्यात 'भीक मागो आंदोलन'

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारने दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि विकेंडला लॉकडाऊन लागू केले. आज लॉकडाऊनचा पहिलाच दिवस असून या लॉकडाऊनला विरोधत करत भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे ‘भीक मागो’ आंदोलन केले. त्याचप्रमाणे उद्यापासून नो लॉकडाऊन, असे देखील म्हणाले. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी राजकारणात घडत असलेल्या विविध मुद्द्यांवर टीका केली. यामध्ये सचिन वाझे, अनिल देशमुख या विषयांवरुन राज्य सरकारवला खडेबोल सुनावले. तसेच यावेळी त्यांनी राज्यसरकारवर अनेक आरोप करत म्हणाले ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवले असते’, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

सातारा येथील पोवई नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उदयराजेंनी पोत टाकून त्यावर बसून समोर रिकामी थाळी ठेवत भीक मागो आंदोलन केले. दरम्यान, त्यांनी लॉकडाऊन विरोधात राज्य सरकारवर टीकाही केली आहे. ते म्हणाले, ‘आम्हाला हे लॉकडाऊन नको आहे. आमची जनता उपाशी मरणार का? तसेच पोलिसांना जर जनतेचा उद्रेक पाहावा लागला तर त्याला जबाबदार प्रशासन राहिल’, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. यापूर्वी देखील त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. ‘राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर तुम्ही राज्यात विकेंडला लॉकडाऊन लावले. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर हातावर पोट असणाऱ्यांनी खायचे काय? नाहीतर अशीच परिस्थिती राहणार असेल तर राज्य सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करावे. यामुळे जनतेला किमान दिलासा तरी मिळेल. नाहीतर असेच सुरु राहिले तर जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा उदयनराजे यांनी दिला होता.


हेही वाचा – फडणवीस चालू देतील तोपर्यंत ठाकरे सरकार चालेल – रामदास आठवले


 

First Published on: April 10, 2021 4:52 PM
Exit mobile version