मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा, पर्यटन समृद्धीसह मुख्यमंत्र्यांच्या १९ घोषणा

मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा, पर्यटन समृद्धीसह मुख्यमंत्र्यांच्या १९ घोषणा

मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा, पर्यटन समृद्ध करणार, मुख्यमंत्र्यांच्या एकूण१९ घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबमध्ये पोहचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमादरम्यान मराठवाड्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. मराठवाड्याचा इतिहास आणि येथील माहिती जगप्रसिद्ध करण्यासाठी आणि पर्यटन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी केला आहे. परभणीसाठी भुयारी गटारी योजना, परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा ही जलजीवन अभियाना अंतर्गत करत आहोत. धाराशिवमध्ये भूमिगत गटार योजना सुरु करत आहोत अशा अनेक घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री कार्यक्रमात संवाद सादत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलाच पलटवार केला आहे. काही जणांना वाटलं की कामे खुप चांगली झाली आहेत. म्हणून आज त्यांनी माझ्या स्वागताचे पोस्टर केले होते. ह्याला विकास नाही म्हणत हा तुमच्यासाठी विकास आसेल आमच्यासाठी नाही. अशी खोचक टीकाही मुख्यमंत्र्यांनी एमआयएम, मनसेसह विरोधकांवर केली आहे.

मराठवाड्यातील संतपीठाच्या बाबतीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, मराठवाडा संतांची भूमी आहे. मराठवाड्याचे वेगळेपण काही वर्षांपासून चर्चेत आहे. आता आपण संतपीठाची स्थापना करत आहोत. जिथे संतांची शिकवण दिली जाणार आहे. या संतपीठाचे लवकरच विद्यापीठ झालं पाहिजे. जगातले अभ्यास इथे अभ्यास करण्यासाठी आले पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच औरंगाबादमध्ये असलेल्या निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठवाडा जगाला देऊ शकतो अशा काही गोष्टी मराठवाड्यात सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यामुळे मराठवाड्यातल्या शाळांचं रुप पाहून अभिमान वाटला पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या १९ घोषणा

मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा
निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार
हिंगोलीमध्ये दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी
औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
सातारा- शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये
औरंगाबादमधील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी
परभणीत शहरात भूयारी गटार योजनेसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद
परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेसाठी १०५ कोटी रुपये
औरंगाबाद – शिर्डी या ११२. ४० किमी मार्गाची श्रेणीवाढ
उस्मानाबाद शहरासाठी १६८ कोटी रकमेची भूमीगत गटार योजना
हिंगोलीत हळद प्रक्रिया उद्योगासाठी ४.५० कोटी
समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड महामार्गाला जोडणार
स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी करण्यासारखे उभारणार
औरंगाबाद सफारी पार्कचा विकास करणार
नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. ६६ कोटी रुपये खर्च
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास ८६ कोटी रुपये खर्च येईल
घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च
औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश
मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास २०० मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार


हेही वाचा : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन, MIM चा CM दौऱ्याला विरोध


 

First Published on: September 17, 2021 10:32 AM
Exit mobile version