निवडणूक आयोगाने…; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

निवडणूक आयोगाने…; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

संग्रहित छायाचित्र

मुंबईः निवडणूक आयोगाने शेण खल्लं, असा घाणाघात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केला. असा निकाल द्यायचा होता. मग पुराव्यांचा खटाटोप कशासाठी केला, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, आमच्याकडून पक्ष सदस्यांची माहिती घेतली. पुरावे घेतले. कागदपत्रे म्हणजे घरची रद्दी दिली नव्हती. आता या रद्दीचं आयोग काय करणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीलाच आम्हाला अंदाज आला होता की हे काही तरी गडबड करतील. म्हणूनच आम्ही मागणी केली होती की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच निवडणूक आयागोने निकाल द्यावा. पण आमचे ऐकले नाही. कारण ते घाबरले आहेत. त्या भीतीतूनच चोरांना राजमान्यता देण्यात आली आहे.

निवडणुक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक. देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित होता. जशी न्यायाधीश निवडीची प्रक्रिया तशीच निवडणुक आयुक्तांच्या बाबतीत असायला हवी, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयावर आमचा नितांत विश्वास. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य परकीय गुतंवणूकदार पण बघताहेत. गेले काही दिवस निवडणुक आयोगाचे थोतांड सुरु होते. हिंदुत्वाचा त्याग केला म्हणजे काय केले? भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो. उद्या त्यांनी नमाज पढले तरी ते हिंदू का?, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील निकालावर देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. ज्या प्रमाणे माध्यमांवर धाडी टाकल्या जात आहेत. राजकीय पक्ष संपवले जात आहेत. या सर्वांचा परिणाम जगावर होणार आहे. असे भारतात होत असेल तर परदेशी गुंतवणूक कशी भारतात येईल, अशी चिंताही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली.

शिवसेना भवनावर दावा सांगायला ही मोघलाई आहे का, असा टोलाही उद्धव यांनी हाणला.

First Published on: February 17, 2023 10:26 PM
Exit mobile version