उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना युतीची दवंडी पिटवण्याचे आदेश

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना युतीची दवंडी पिटवण्याचे आदेश

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना युतीची दवंडी पिटवण्याचे आदेश

शिवसेना आणि भाजपमधील रुसवा-फुगवा संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार, अशी घोषणादेखील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अनेक सभांमधून केली होती. परंतु, अखेर शिवसेनेने भाजपसोबत युती केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती झाली आहे. परंतु, या युतीमागील प्रमुख कारण हिंदुत्व असून त्याची दिवंड पिटवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या जिल्हा आणि तालुका पातळीवरील शिवसैनिकांच्या खांद्यावर सोपवली आहे. आज शिवभवन येथे जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसैनिकांना युती झाल्याचे घरोघरी सांगा’, असे आवाहन केले आहे.

युतीवरुन शिवसैनिक नाराज

१८ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली होती. परंतु, गेल्या कित्येक महिन्यांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत. त्यामुळे शिवसैनिकही भाजपच्या विरोधात होते. आपण स्वबळावर निवडणूक लढवणार, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे शिवसैनिकांनीही उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवला होता. लाखो शिवसैनिकांचं शिवसेनेशी अविट असं नातं आहे. त्यांचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. त्याप्रेमामुळेच ‘पक्षप्रमुख जे म्हणतील ते खरं’ असा शिवसैनिकांचा पवित्रा आहे. परंतु, या युतीमुळे शिवसैनिक नाराज झालेले दिसत आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका शिवसेनालाही बसण्याची दाट शक्यता आहे.

 


हेही वाचा –शिवसेना कार्यकर्ते किरीट सोमय्यांविरोधात प्रचार करणार!

First Published on: February 23, 2019 5:11 PM
Exit mobile version