अंधभक्तांचा हल्ली सुळसुळाट, उद्धव ठाकरेंचा नेमका टोला कोणाला?

अंधभक्तांचा हल्ली सुळसुळाट, उद्धव ठाकरेंचा नेमका टोला कोणाला?

मुंबईः नितीनजी तुम्ही बाबासाहेबांचे भक्त आहातच, आम्हीही भक्त आहोत. भक्त म्हणजे अंधभक्त नाही, अंधभक्तांचा हल्ली सुळसुळाट आहे. नेमकं भक्त आणि अंध भक्त त्यांच्यातला हा फरक आहे. अंधभक्त म्हणजे काय नुसतं उदो उदो करत सुटायचं, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. ‘आंबेडकर ऑन पाप्युलेशन-कंटेंपररी रिलिव्हन्स’ या ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच मल्लिकार्जुन खरगे, के. राजू, सेल्वम, केव्हिन ब्राऊन, प्रा. सुखदेव थोरात, प्रा. प्रदीप आगलावे यांच्या उपस्थितीत आज प्रकाशन पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

आपण ज्याला दैवत मानतो, त्याच्यापासून आपला काही तरी स्वार्थ, त्याला दैवत मानण्यामध्ये आहे. पण त्याच्यापासून आम्ही काय घ्यायचं. काय घ्यायचं किंवा नका घेऊ, मिळतंय तेव्हढंच घ्या. अंधभक्त आणि भक्तामधील जे विश्लेषण आपण म्हणू, अंधभक्त आणि भक्त अंधभक्त काही काही वेळेला दैवत बदलू शकतो. पण त्याचा जिकडे फायदा असतो, तिकडे तो झुकतो. पण भक्त हा तोच असतो की मी आयुष्याची वाटचाल करेन, माझ्या दैवतानं गुरूने, माझ्या महामानवाने सांगितलेल्या वाटेनेच करेन. केवळ मीच करणार नाही, त्यांनी दाखवलेली जी वाट आहे ती मी समजून घेऊन लोकांनासुद्धा सांगेन, म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं आजचं प्रकाशन हे आगळंवेगळं आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय. माझ्या एका सहकाऱ्यानं अभ्यास करून एका महामानवावर लिहिलेलं हे पुस्तक आहे. मी अभ्यास करून हा शब्द जास्त जोरात एवढ्यासाठी म्हणेन, अनेकांना असा समज असतो की राजकारणी आणि अभ्यास हे दोन वेगवेगळे टोकाचे शब्द आहेत. राजकारणी म्हटल्यानंतर तो अभ्यासू असेलच असं नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महाविकास आघाडीचं गेल्या दोन ते अडीच वर्षात वेगळं रसायन तयार झालेलं आहे. त्या रसायनामध्ये मला हे सगळे लाभलेले, जिवाला जीव देणारे माझे सहकारी आहेत. माझ्या एका सहकाऱ्यानं अभ्यास करून एका महामानवावर लिहिलेलं हे पुस्तक आहे. मी अभ्यास करून हा शब्द जास्त जोरात एवढ्यासाठी म्हणेन, अनेकांना असा समज असतो की राजकारणी आणि अभ्यास हे दोन वेगवेगळे टोकाचे शब्द आहेत. राजकारणी म्हटल्यानंतर तो अभ्यासू असेलच असं नाही. पण नितीनजी तुम्ही हा समज खोटा करून दाखवलात. त्यासाठी तमाम राजकारण्यांच्या वतीनं मी तुम्हाला खास धन्यवाद देतो, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

कारण बोलायला लागल्यावर बऱ्याचशा जुन्या आठवणी येतात, पण त्या सगळ्या काही मी तुम्हाला सांगत बसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण दैवत मानतो, खरंच दैवत आहेत. अशी माणसं किती वर्षातून एकदा जन्माला येत असतील, हा विचार केला तरी थांगपत्ता लागत नाही. काही काही म्हणजेच सर्वसामान्य माणसं अशी असतो, की जन्म कुठे घ्यायचा, कुठे व्हावा हे कोणाच्या हातात नसते, पण जन्माला आल्यानंतर आपण आयुष्याची वाटचाल करत राहतो, एक वाट दिसते, त्या वाटेने आपण चालत राहतो. पण बाबासाहेबांसारखी माणसं आयुष्याच्या वाटेवर चालताना विचार करतात. ही वाट नेमकी मला कुठे नेत आहे. कोणत्या दिशेनं वाट जातेय. खरंच त्या दिशेनं जाण्यासाठी माझ्या आयुष्याची एकच वाट आहे काय? की आणखी काही दुसऱ्या वाटा आहेत. ती मी अंगीकारू शकतो का? हा विचार करणं यालासुद्धा धाडस लागतं आणि विचार केल्यानंतर ती वाट अंगीकारनं हे महामोठं धाडस आहे. ते बाबासाहेबांनी केलं म्हणून ते दैवत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य ज्या एका घटनेवरती टिकून आहे ती घटना बाबासाहेबांनी लिहिल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. या कार्यक्रमानंतर मला मुंबईत आणखी एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच आपली दिलगिरी व्यक्त करतो. मी आतापर्यंत अनेक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे. पण आजचं हे पुस्तक प्रकाशन थोडंसं आगळंवेगळं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.


हेही वाचाः 2024 ला कोल्हापूरची जागा आम्ही 100 टक्के जिंकणार, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

First Published on: April 17, 2022 7:25 PM
Exit mobile version