न्याययंत्रणा तुम्ही बुडाखाली घेणार असाल तर… उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

न्याययंत्रणा तुम्ही बुडाखाली घेणार असाल तर… उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

आज संपूर्ण स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी बिल्कीस बानो प्रकरण मांडत भाजपवर ताशेरे ओढले. राज्याला केंद्राइतकेच समान अधिकार आहेत. न्याय व्यवस्थेवर मतं व्यक्त केली जात आहेत. राज्य केंद्राची गुलाम नाहीत. लोकशाही पायदळी तोडवून सत्ता ज्यांना पाहिजे त्यांना खाली खेचा. न्याय यंत्रणा ही अपारदर्शक आहे. पंतप्रधानांनी आता न्यायमूर्ती नेमला पाहीजे. लोकशाहीचे कितीही स्तंभ असतील परंतु हे स्तंभ गुलाम म्हणून जर वापरले जाणार असतील तर त्या स्तंभाचा उपयोग काय, न्याय यंत्रणा तुम्ही तुमच्या बुडाखाली घेणार आहात का मग न्यायालय बंद करून टाका, आता हे बोलल्यानंतर माझ्यावर खटला उभारला जाईल, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

मुंबईतल्या शिवाजी मंदिर येथे ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आलेले आहेत. कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

आज आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललो आहोत. यामध्ये कोणाच्याही मनात तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही. बुर्खा घातला गेला आहे कारण स्वत:चा चेहरा हा जर दाखवला तर लोकं जवळ येणार नाहीत. लोकांना जवळ आणण्यासाठी तो चेहरा आणि मुखवटा लावायचा, मतं मिळवायची आणि राज्य करायचं. पूर्णपणे जी इंग्रजांची निती होती. तोडा फोडा आणि राज्य करा तीच सुरू आहे. जाती पाती आणि धर्माच्या भिंती उभ्या करायच्या आणि राज्य करायचं. या कार्यक्रमात अनेक शाखाप्रमुख, नगरसेवक आणि नेते मंडळी बसले आहेत. परंतु बाळासाहेबांनी त्यांना तू कोणत्या जातीचा आहेस, असं कधीही विचारलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : प्रकाश आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा आणि माहितीचा धबधबा, उद्धव ठाकरेंकडून कौतुकौद्गा


First Published on: November 20, 2022 10:05 PM
Exit mobile version