रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू?, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू?, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कल्याणमधील कोपर पुलाचं लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोपर पुलाच्या निर्मिती केल्यामुळे प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच कल्याण डोंबिवलीसाठी जे हवं ते देईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. विकासकामे आणि रुग्णालये सुरु करत असताना काही जणांकडून मंदिरं सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्यातील आरोग्य केंद्रे सुरु करण्याची गरज असल्याचे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवला टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचेही आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोपर पूलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर आणि फेरिवाल्यांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, अपेक्षा नेहमी जास्त असतात आणि त्या असल्या पाहिजेत मग त्या अपेक्षा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडून तुम्हाला आहे. केंद्रीय मंत्री म्हणून तुमच्याकडून आम्हाला आहेत. विकासकामे करण्यासाठी लोकं आपल्याला निवडून देत असतात.

आज मंदिरे जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं रुग्णालयाच्या माध्यमातून आपण उघडता आहात त्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार आहे. धार्मिक स्थळं उघडी राहिले पाहिजेत ठिक आहे हकत नाही. पण आता आरोग्य केंद्रांची मंदिरं उघडी करण्याची गरज आहे. आरोग्य केंद्र उघडणं महत्त्वाची आहेत. आरोग्याची मंदिरं महत्त्वाची आहेत. मंदिरं उघडणार पण टप्प्याटप्प्यानं उघडणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय अशा घोषणा देतो, आम्हीही घोषणा देतो पण नुसत्या घोषणाच दिल्या नाहीत. तर घोषणेच्या पुढे जाऊन हिंदुत्त्वाचे रक्षण करणारी शिवसेना आहे. भारत मातेची मुलं जर आरोग्याच्या सुविधेअभावी तळमळत असतील तर भारतमाता आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे नुसत्या घोषणा देऊन ती बरी होणार नाहीत त्यासाठी आपल्याला आरोग्य केंद्रे सुरु करावी लागतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

फेरिवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावा लागेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटलंय की, रिंगरोड, स्कायवॉक फेरिवाला मुक्त, ठाण्यातील दुर्घटना पाहिल्यानंतर काही ठिकाणी कठोर कायदा राबवावा लागेल. तिकडे दया दाखवता येणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे. इतर ठिकाणीही फेरिवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावा लागेल. मुंबई, ठाणे सर्वच भागातील वाढत्या संख्येवर आळा घालावा लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला म्हटलं आहे.

First Published on: September 7, 2021 3:43 PM
Exit mobile version