Uddhav Thackeray : आमच्या हिंदुत्वात ओव्या पण तुमच्या हिंदुत्वात शिव्या; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : आमच्या हिंदुत्वात ओव्या पण तुमच्या हिंदुत्वात शिव्या; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना नेते पेंगले, भाजपाकडून व्हिडीओ व्हायरल

आमच्या हिंदुत्वात ओव्या आहेत, पण तुमच्या हिंदुत्वात शिव्या आहेत. त्यांच्या शिविगाळीला शिविगाळीने उत्तर देऊ नका. ती आपली संस्कृती नाही. आपलं हिंदुत्व नाही. ते भाजपचं नासलेलं कुजलेलं हिंदुत्व आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून, त्यांची नुकताच सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. (uddhav thackeray slams bjp in ratnagiri sabha)

“भाजप आणि त्यांचे शीर्षास्त नेते. सध्या भाजपचे शीर्षासन सुरू आहे. भाजपचे डोकं खाली गेलंय आणि वर पाय गेलेत. त्यामुळे त्यांच्या असभ्य आणि असंस्कृत भाषेला अजिबात उत्तर देऊ नका. कारण माझी कोकणातली जनता तेवढी सज्ञान आहे. भारतीय जनता पक्षाची संस्कृती आता बाहेर आली आहे. जे त्यांचे रामभाऊ माळगी आणि प्रभोधीनी यामध्ये शिव्या आणि घाणेरडे प्रकार शिकवत असतील हे मला नव्हतं कधी वाटलं. ज्यापद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे, त्यावरून मी यवतमाळ-वाशिममध्ये दिलगिरी व्यक्त केली की, आम्ही 25-30 वर्ष एका हिदुत्वाच्या वेडापायी ते जिथे नव्हते तिथे त्यांना खांद्यावर घेऊन फिरलो. तेव्हा शिवसेनेने यांना दिला नसता तर, यांना कोणीच खांदा दिला नसता. त्यावेळी अडवाणी, वाजपेयी यांच्यासारखे नेते होते. त्यावेळी संस्कृती होती. पण आताच्या भाजपला संस्कृती म्हणणे हेच पाप आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “भास्कर जाधव तुम्ही ज्यापद्धतीने लढत आहात बेधडकपणे लढत आहात. तुम्ही लक्षात घ्या तुम्ही एकटे नसून संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. तसेच, विनायक राऊत यांना खासदार म्हणून निवडून नसतं दिलं तर इथे गुंडगिरी वाढली असती. आपलं महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी काम करत होतो. तेव्हा भाडोत्री जनता पक्षाने गद्दारी करून सरकार पाडायला लावलं. जे गद्दार गेले त्यांच्या बापांना आणि पोराबाळांना विचारतो की, मी तुम्हाला काय कमी दिलं होतं. मंत्री पद, आमदारकी सगळं दिली. पण हा न्याय कोणता? मी अनेकदा सांगितलं की, मला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण बाकीच्या देशात पाहिलं तर त्यांचा नेता मुख्यमंत्री होतो. एका अफवादात्मक परिस्थित मला मुख्यमंत्रीपद स्विकाराव लागलं. पण ज्या घराने तुमच्या घराण्याला पोसलं. तुमच्या मुला-बाळांची चिंता वाहिली. त्याच घराण्यात असे पद आलं तर, तुम्ही गद्दारी करून खाली पाडलं. ही गद्दारी करून तुम्ही शिवसेनाप्रमुख, उद्धव ठाकरे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांच्या पाठित वार केला. पण त्यावेळी शिवसेना यांच्या मागे लागली नसती, तर तुम्ही त्यांना विचारलं असता का? त्यामुळे त्यांच्या शिविगाळीला शिविगाळीने उत्तर देऊ नका. ती आपली संस्कृती नाही. आपलं हिंदुत्व नाही. ते भाजपचं नासलेलं कुजलेलं हिंदुत्व आहे. जे गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत. पण तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या आहेत”

याशिवाय, “कोकण माझ्या हक्काचं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की, ऐन कामाच्या वेळेला आपण घरच्यांना विसरतो. तसा मी विसराळू मी नाही. कोकणाचा आशिर्वाद घेऊन मी महाराष्ट्र फिरतो आहे. शिवसेनाप्रमुख कोकणात नतमस्तक झाले होते”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – AJIT PAWAR : शिवतारेंनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपली भूमिका मांडावी; अजितदादांचा नाव न घेता सल्ला

First Published on: March 14, 2024 1:05 PM
Exit mobile version