घरताज्या घडामोडीAjit Pawar : शिवतारेंनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपली भूमिका मांडावी; अजितदादांचा नाव न...

Ajit Pawar : शिवतारेंनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपली भूमिका मांडावी; अजितदादांचा नाव न घेता सल्ला

Subscribe

'महायुतीतील सर्वच घटक पक्षांना विनंती आहे की, वातावरण खराब होईल, असे वक्तव्य कोणीच करू नका. जे काही आपल्याला बोलायचं असेल ते त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे बोलावं', अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता विजय शिवतारे यांना सल्ला दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘महायुतीतील सर्वच घटक पक्षांना विनंती आहे की, वातावरण खराब होईल, असे वक्तव्य कोणीच करू नका. जे काही आपल्याला बोलायचं असेल ते त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे बोलावं’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता विजय शिवतारे यांना सल्ला दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अनेक आरोप करत विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. (ajit pawar on vijay shivtare shivsena ncp eknath shinde baramati)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे आज बारामतीत असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “लोकशाहीमध्ये कोणी काय बोलावं हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. आम्ही महायुतीत आहोत. महायुतीतील सर्वच घटक पक्षांना विनंती आहे की, वातावरण खराब होईल, असे वक्तव्य कोणीच करू नका. जे काही आपल्याला बोलायचं असेल ते त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे बोलावं. म्हणजे माझ्या राष्ट्रवादी काही लोकांना बोलायचं असेल तर, त्यांनी माझ्या कानावर घालावं. शिवसेनेतील काही लोकांना बोलायचं असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालावं. भाजपच्या काही लोकांना बोलायचं असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घालावं. त्यामुळे सगळीकडचे वातावर चांगलं राहायला मदत होईल”, अशा शब्दांत विजय शिवतारे यांना अजित पवारांनी नाव न घेता सल्ला दिला.

- Advertisement -

“माझं आणि बारामतीकर यांचं वेगळं नात आहे. बारामतीकर नेहमीच मला प्रतिसाद देतात. मी त्यांची दिवसरात्र काम करत असतो. त्यामुळे मी आल्यावर माझे ते जोरदार स्वागत करतात”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा – AJIT PAWAR : …नाहीतर निलेश लंकेंना आमदारकी सोडावी लागेल; अजितदादांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -