बॉम्ब फोडा, पण धूर येऊ देऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

बॉम्ब फोडा, पण धूर येऊ देऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

राज्यातील राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीतील नेते आणि विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर फडणवीस प्रत्युत्तर देताना नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावला आता दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडून धमाका करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमादरम्यान मिश्किल टोला लगावला आहे. काही जण म्हणत आहेत फटाके फोडणार म्हणून मात्र फटाके फोडा पण धूर येऊ देऊ नका असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती येथील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इन्कयुबेशन सेंटरचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आहे. आपल्या संवादाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. फडणवीसांनी आपण दिवाळीनंतर धमाका करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी दिवाळी तशी सुरु झाली आहे. काही जण म्हणत आहेत. फटाके फुटणार आहेत. बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे आवाज येऊ द्या पण धूर काढू नका असा टोला लगावत कोरोना अजून गेला नाही असे म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला

फुलपाखरालासुद्धा पंख फुटतात काही वेळा वाळवीला सुद्धा पंख फुटतात परंतु त्या पंखांना बळ देण्याचे काम या संस्था करत असतात. बदल घडायला हवा. राजकारणातसुद्धा इनक्युबेटर सेंटर गरजेचे आहे. आम्ही सुद्धा २५-३० वर्षांपुर्वी इनक्युबेटर सेंटर उघडले होते. इनक्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली आणि आता पुढे काय झाले तुम्ही बघत आहात असे बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री, भाजप नेते नाराय राणे यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर स्तुतीसुमने

शरद पवारांसाराखा तरणाबांड नेता, ज्याने विकासाचा सुर्य दाखवला आणि अजूनही थांबायला तयार नाहीत. या संस्थेचे विशेष म्हणजे पवार साहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचे सगळ्या संस्थांचे करत आहे. परंतु सगळे पवार कुटुंबीय त्यामध्ये मनापासून काम करत आहेत. पवार कुटुंब विकासाच्या ध्यासात रमलेले आहे. राजकारणात आपले पटत नाही म्हणून चांगले काम करत असणाऱ्यांवर काही संकटे आणणं ही आपली संस्कृती नाही. पाठिंबा देता आला नाही तरी त्यात विघ्न आणू नये. विघ्ण संतोषी खूप आहेत परंतु त्यांना मिळतं काय जो आनंद इथे मिळतो तोच, विघ्न संतोषींना आनंद हा शब्दच त्यांच्या आजूबाजूला फिरत नाही.


हेही वाचा :  देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले… कोणाच्यात हिंमत


 

First Published on: November 2, 2021 1:39 PM
Exit mobile version