देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले… कोणाच्यात हिंमत

nawab malik devendra fadnavis
माझं ट्विट आणि शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी; नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना दिला होता. नवाब मलिकांनी फडणवीसांवर वसुली आणि ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. फडणवीसांनी नवाब मलिकांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केला होता. यावर नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलं असून कोणाच्यात हिंमत नाही माझा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगण्याचे माझी ६२ वर्षे मुंबईत गेले आहेत. माझे घर आरशाचे आहे ना काचेचा महाल आहे असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, माझा अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. मी माझे ६२ वर्षांचे जीवन मुंबईत काढलं आहे. कोणामध्ये हिंमत नाही की माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगायला. ज्यांचे घर आरशाचे आहे त्यांनी दगड मारु नये असे फडणवीस म्हणाले परंतु माझे घर ना आरशाचे आहे नाही आरशाचा महाल असे प्रत्युत्तर नवाब मलिकांनी दिलं आहे.

देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे की, तुम्ही गृहमंत्री होता आणि महाराष्ट्राला माहिती आहे. सगळ्यात जास्त कोणी फडणवीसांच्या कामावर आणि मागील सरकारच्या कारभारावर प्रश्न करत होतं तर ते नवाब मलिक होते. फडणवीस तुम्ही विसरला असाल जेव्हा तुम्ही १ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता तेव्हाच मी प्रश्न उपस्थित केला होता की, शहरात बोगस देवेंद्र फडणवीस कोण फिरत आहे. तुम्हाला सुचित केले होते आम्ही, तुमचा भाऊ शहरांतील हॉटेल्समध्ये काय करत होता याची माहिती दिली होती. चेंबूरमध्ये जाऊ नका तुम्हाला सांगितले होते. आम्ही कधीही व्यक्तीगत राजकारण केलं नाही. त्यावेळी जर हॉटेल्सची सीसीटीव्ही फुटेज दाखवली असती तर लोकं तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नसती असा घणाघात नवाब मलिकांनी केला आहे.

मग कारवाई का नाही केली

अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावर नवाब मलिक म्हणाले, तुम्ही सांगत आहात की, नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. तु्म्हाला एवढे पुरावे मिळूनही शांत बसलात एका राज्याच्या प्रमुखाला माहिती मिळाली की, कोणता व्यक्ती, नेता, राजकीय व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधी आहेत तर त्याची जबाबदारी आहे की त्यावर कारवाई करणे आणि त्यानुसार कारवाई केली पाहिजे होती. परंतु खरं समोर आल्यावर हवेत बाण मारल्यावर प्रकरण बंद होईल असे नाही.

तुमचे प्रशासन कमजोर होते का?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना विचारु इच्छितो की, मुख्यमंत्री असताना शहरात काय काय चाललं आहे. नेते मंडळी काय करत आहेत. याबाबतची माहिती असते. फोर सीजन हॉटेलमध्ये लगातार ड्रामा लेट्स प्रेगट मॅट या पार्टीचे आयोजन होत राहिले. या पार्टीचे आयोजक कोण आहेत? पार्टीच्या टेबलची किंमत १५ लाख रुपये होती. रात्रभर पार्टी सुरु होती. १५ करोड रुपयांची पार्टी होती. तुम्हाला माहिती नव्हते का? १५ करोड रुपयांची पार्टी सुरु आहे. तुमच्या पोलिसांना याची माहिती नव्हती का? तुमचे पोलीस दल कमजोर होते का? असे सवाल नवाब मलिकांनी केला आहे.


हेही वाचा :  Drug Case : दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार, नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर