मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक, उद्धव ठाकरे धक्कातंत्राचा अवलंब करणार?

मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक, उद्धव ठाकरे धक्कातंत्राचा अवलंब करणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार आहे. भाजपच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा अशी मागणी बहुतांश खासदारांची मागणी आहे. शिवसेनेच्या आमदारांनी भाजपसोबत जात बंड पुकारले यानंतर आता खासदारांचीसुद्धा भाजपसोबत जाण्याची मागणी केली आहे. या सर्वच विषयांवर खासदारांच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक आयोजित केली आहे. नाराज खासदारांच्या मागणीवर चर्चा होऊ शकते. परंतु या बैठकीचा मुख्य हेतु राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत आहे. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी राजेंद्र गावित आणि राहुल शेवाळे यांनी केली आहे. यापूर्वीसुद्धा शिवसेनेने एनडीएमध्ये असताना काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा पाटील आणि प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्याच प्रमाणे आता भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिवेसना सध्या महाविकास आघाडीमध्ये आहे. यामुळे धक्कातंत्राचा अवलंब करत उद्धव ठाकरे भाजपच्या उमेदवारा पाठिबा देऊ शकतात.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत एनडीएमध्ये असताना काँग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा दिला होता. त्याच प्रमाणे त्यांचे पुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये असताना विरोधी पक्ष भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. उद्धव ठाकरेंनी अशी भूमिका घेतल्यास ती महाविकास आघाडीच्या विरोधातील भूमिका आहे.

प्रतोदपदावरुन चर्चा होण्याची शक्यता

शिवसेनेचे लोकसभेतील खासदार राजन विचारे यांची प्रतोदपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी यांना हटवण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदारसुद्धा बंडखोरीच्या तयारीमध्ये आहेत. १८ पैकी १२ पेक्षा अधिक खासदारांनी भाजपसोबत जावे अशी मागणी केली आहे. या सर्वच विषयांवर उद्धव ठाकरे बैठकीत चर्चा करण्याची शक्यता आहे.

भाजपसोबत जाण्याची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी खाजगीमध्ये बैठक करुन तसेच पत्राद्वारे भाजपसोबत जाण्याबाबतची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलो आहे. त्यामुळे आपण भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी अनेक खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


हेही वाचा : लोकसभेतही शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर! 19पैकी 14 खासदारांचा स्वतंत्र गट?

First Published on: July 11, 2022 12:57 PM
Exit mobile version