शेतकऱ्यांनी त्यांच्यावर पहिला आसूड ओढला पाहिजे; दानवेंची ठाकरेंवर जहरी टीका

शेतकऱ्यांनी त्यांच्यावर पहिला आसूड ओढला पाहिजे; दानवेंची ठाकरेंवर जहरी टीका

शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर आता विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनी यांच्यावर पहिला आसूड ओढला पाहिजे, अशा शब्दांत दानवेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आसूड फक्त हातात ठेवून नका तो वापरा. सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा. आमच्याशी गद्दारी केली, शेतकऱ्यांशी करु नका. या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली, ज्यावर आता रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दानवे पुढे म्हणाले की, राजा जनतेत जाणार नाही, तोपर्यंत जनतेचे दु:ख कळणार नाही. हे अनेकदा त्यांनी आम्ही सांगितले, तरी उद्धव ठाकरे हे घराहाबाहेर पडले नाही. आपले कुटुंब, आपली जबाबदारी एवढचं काम त्यांनी केले. आता एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आपल्यासोबत घेत सत्तापरिवर्तन केले. तेव्हा लोकांमध्ये गेल्याशिवाय जनसमर्थन मिळत नाही. हे उद्धव ठाकरेंना समजले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, आरोपही त्यांनी केला.

विरोधी पक्षाचा माणूस जनतेत जातो. त्यांचे प्रश्न विचारतो. त्यांना शेतकऱ्यांनी आसूड दिला, तो आसू़ड चालविण्याचा त्यांनी सुतोवाच केला. त्यांचे प्रश्न यांनी सोडविले नाहीत. त्यामुळे पहिला आसूड यांच्यावर ओढला पाहिजे. नंतर त्यांनी अशी भाषा वापरली पाहिजे, असा इशाराही दानवेंनी दिला आहे.

उद्धव ठाकरे आता बाहेर पडत, काही ठिकाणी दौरे करत आहेत. याचे क्रेडित त्यांना स्वत:ला जात नाही. याचे क्रेडिट हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते. कारण अडीच वर्षे ना ते मंत्रालयात गेले ना राज्यात गेले, घरी बसून कारभार केला. असा टोलाही दानवेंनी लगावला आहे.


तरुणीला आयटम म्हणणं तरुणाच्या अंगलट; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

First Published on: October 24, 2022 2:41 PM
Exit mobile version