तोंड बंद कर, तुला महाराष्ट्र अजून कळला नाही; नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं

तोंड बंद कर, तुला महाराष्ट्र अजून कळला नाही; नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका केली आहे. कोण हा आदित्य?, आम्ही नाव घेत नाही, जाऊद्या आमच्यासमोर वाढलेला मुलगा आहे. काहीही बोलतो, तोंड बंद कर तुला महाराष्ट्र अजून कळला नाही, अशा शब्दांत नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं.

तुला महाराष्ट्र अजून कळला नाही

कोणालाही गद्दार आणि काहीही बोलतो. शिवसैनिक गद्दार? साहेबांनी वाढवलेले शिवसैनिक गद्दार? कोण ऐकून घेईल, आता प्रोटेक्शन आहे म्हणून हे सुचतंय, थोड्यादिवसांनी ते पण जाईल, एकटं फिरायला लागेल तेव्हा घरातून बाहेर पडणार नाही तू, तोंड बंद कर, तुला महाराष्ट्र अजून कळला नाही, देश तर सोडाच, असं नारायण राणे म्हणाले.

अरे मुख्यमंत्री पद गेलं आणि व्हिक्टरी काय?

एका बाजूला पदावरून खाली उतरतो. दुसऱ्या बाजूला युवराज आदित्य ठाकरे व्हिक्टरी दाखवतात. बॅक टू द पव्हेलियन.., अरे मुख्यमंत्री पद गेलं आणि व्हिक्टरी काय?, आदित्य आणि उद्धव काय करतात याबाबत काहीही मेळ नाही. महाराष्ट्रभर यात्रा काढून गद्दारांना धडा शिकवा, असं आदित्य ठाकरे म्हणतायत. कोण शिकवणार? तू शिकवणार?, असा सवाल राणेंनी उपस्थित करत आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणजे नाटकी माणूस

उद्धव ठाकरे म्हणजे एक नंबरचा नाटकी माणूस आहे. राज्यातल्या माणासाला मुलाखतीचा काय फायदा? एकीकडे रडून दाखवायचं दुसरीकडे कपटीपणा करायचा. जी मुलाखत घेतली जाते आहे त्याचा महाराष्ट्राला काय फायदा? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारलाआहे.


हेही वाचा : ठाकरे खोटारडे आणि कपटी, नारायण राणेंचा हल्लाबोल


 

First Published on: July 26, 2022 7:24 PM
Exit mobile version