केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ, केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ, केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा

नारायण राणेंच्या अधीश बंगल्याविरोधात पालिकेची दुसरी नोटीस, अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम

केंद्रीय सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून नारायण राणे यांना आता केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. शुक्रवारी गृह मंत्रालयाकडून नारायण राणेंच्या झेड दर्जाच्या सुरक्षेचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेचCISF कडून राणेंना सुरक्षा देण्यात येणार आहे. राणेंच्या जिवाला असलेला धोका वाढत असल्याने त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. इथून पुढे नारायण राणे जिथेही जातील तिथे त्यांच्यासोबत CISF चे सहा- सात कमांडर असतील. त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी देखील त्यांना सुरक्षा देण्यात येणार आहे. CISFचे उपमहानिरिक्षक आणि मुख्य प्रवक्ते डॉ. अनिल पांडेय यांनी माहितीला दुजोरा दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मागील वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. CISF चे सशस्र कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. झेड दर्जाच्या सुरक्षेत CISF च्या कमांडोंची संख्या वाढण्यात आली आहे. या आधी देशाचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल,आरएसएसचे सरसंघसंचालक मोहन भागवत या प्रमुख व्यक्तींना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी देशाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. यासंदर्भात त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक देखील करण्यात आली होती. केंद्र सरकारने नंतर या प्रकरणाचा अहवाल मागितला होता. हा अहवाल मिळाल्यानंतर केंद्र सरकारने नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ केली आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांची २५ ते ३० वर्षे अंडी उबवण्याची टीका, नारायण राणेंनी दिले रोखठोक उत्तर

First Published on: December 4, 2021 12:38 PM
Exit mobile version