लाच घेताना बीडमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अटकेत

लाच घेताना बीडमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अटकेत

प्रातिनिधीक

बीडमध्ये एक खळबजक घटना घडली आहे. चक्क अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयातील कारकून यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. शासकीय निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली आहे. बी.एम.कांबळे आणि महादेव महाकुंड अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या मदतीने पोलिसांनी शनिवारी ही धाड टाकण्यात आली.

आरोपी बी.एम.कांबळे हे अप्पर जिल्हाधिकारी पदावर तर आरोपी महादेव महाकुंड हे तहसिल कार्यालयात कारकून पदावर कार्यरत होते. लाच लुचपत प्रतिबंक विभागाने बी.एम.कांबळे यांच्या नांदेड, औरंगबाद, तळेगाव आणि बीड येथील निवासस्थानी छापे मारण्यात आले. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आणि पुराव्यांच्या आधारे एसीबी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. दरम्यान, इतक्या वरिष्ठ पदावरच्या अधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाचावर धारण बसली आहे.

First Published on: February 2, 2019 9:34 PM
Exit mobile version