युपीएससीचे निकाल जाहीर; सृष्टी देशमुख देशात पाचवी

युपीएससीचे निकाल जाहीर; सृष्टी देशमुख देशात पाचवी

सृष्टी देशमुखने महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. मुलीमध्ये सृष्टी देशमुख पहिली आली आहे तर देशातून तिचा पाचवा क्रमांक लागला आहे. पहिल्या ५० उमेदवारांमधून महाराष्ट्राचे चार विद्यार्थी आहेत.  तृप्ती अंकुश धोडमिसे – १६, वैभव सुनिल गोंदणे – २५, मनिषा मानिकराव आव्हाळे – ३३ आणि हेमंत केशव पाटील – ३९ अशी या पाच जणांची नावे आहेत. विशेष म्हणजे पाचपैकी यात दोन मुली आहेत. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

कनिष्क कटारिया देशातून पहिला आला आहे. द्वितीय क्रमांकावर अक्षत जैन आणि तृतीय क्रमांकावर जुनैद अहमद आहे. युपीएससी ही देशातील सर्वोच्च सनदी अधिकाऱ्यांसाठीची परिक्षा आहे. आता लागलेल्या निकालांची परिक्षा वर्ष २०१८ मध्ये झाली होती आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती ४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरु झाल्या होत्या.

यावर्षी ७५९ विद्यार्थ्यांनी परिक्षेत यश मिळवले आहे. यापैकी IAS पदासाठी – १८०, IFS पदासाठी – ३०, IPS पदासाठी – १५०, Central Services Group A पदासाठी – ३८४ तर Group B – ६८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे

First Published on: April 5, 2019 7:57 PM
Exit mobile version