शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाने साधला कंगनावर निशाणा

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाने साधला कंगनावर निशाणा

भाजपाला खुश करून माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या - कंगना

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उर्मिला शिवसेनेत दाखल झाली. मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उर्मिलाने शिवबंधन बांधले. उर्मिलाने शिवसेनेत आपला प्रवेश करताच अभिनेत्री कंगनावर निषाणा साधला आहे. ‘कंगनाला अनावश्यक महत्त्व देण्याची गरज नाहीय’, असे म्हणून उर्मिलाने कंगनाला चांगलाच टोला लगावला आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने सरकारवर अनेक आरोप केले. कंगना प्रकरणावरून राजकिय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या. कंगनाने मुंबईची पाकिस्तानसोबत केलेल्या तुलनेमुळे मुंबईकारांची मने दुखावली गेली. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर उर्मिलाला कंगनाविषयी प्रश्न विचारण्यात आले. कंगाला अनावश्यक महत्त्व देण्यात दिले आहे, असे उर्मिलाने म्हटले आहे.

कंगनाविषयी उर्मिला प्रश्न केला असता उर्मिलाने कंगानावर चांगलाच निषाणा साधला आहे. ‘यापूर्वी मी दिलेल्या मुलाखतीतही मला कंगनाविषायी अनेक प्रश्न विचारण्यात आले. परंतु मला असे वाटते की, कंगनाला अनावश्यक महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे मी कंगनाला यापुढे आणखी महत्त्व देण्याचा विचार करत नाही.’ असे उत्तर देत उर्मिलाने कंगनावर चांगलाच निशाणा साधला आहे. शिवसेनेत प्रवेश करताच अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कामाला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. उर्मिलाला विधान परिषदेत पाठविण्यात येणार आहे, असे म्हटले जात आहे. राज्याच्या राज्यपालांनी शासनाला पाठवलेल्या १२ नावांच्या यादीत उर्मिला मातोंडकरचेही नाव आहे.


हेही वाचा – विनामास्क फिरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवा – उच्च न्यायालय

First Published on: December 2, 2020 7:31 PM
Exit mobile version