खड्डे बुजविण्यास आधुनिक तंत्रज्ञान वापरा, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

खड्डे बुजविण्यास आधुनिक तंत्रज्ञान वापरा, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांबाबत दिलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी पार पडलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक उपायुक्तांशी समन्वय साधावे अशा सूचना केल्या आहे. तसेच येत्या आठवड्यात पुन्हा टास्क फोर्सची बैठक बोलविण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. (Use modern technology to fill potholes, Thane Collector orders)

हेही वाचा – ठामपाचे पाचवे डायलेसीस केंद्र मुंब्रा येथे सुरू

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडून वाहतूक कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाच ते दहा मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर लागत असल्याने नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे. ही बाबत लक्षात घेत, मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने टास्क फोर्सची बैठक घेण्याचे निर्देश दिले. खड्डे आणि सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. त्याची मॉन्सनपूर्व बैठक यावर्षी मार्चमध्ये घेण्यात आली.

हेही वाचा – शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांची पुनर्नियुक्ती

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या आठवड्यात ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन खड्डे बुजविण्याबाबत यंत्रणेला निर्देश दिले होते. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका आयुक्त, शहर अभियंता, ग्रामीण पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, एमएमआरडीए, एमएसआरडीए, राष्ट्रीय महामार्ग, वाहतूक शाखा उपायुक्त यांच्याशी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी नार्वेकर म्हणाले, जुलै महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या सुमारे १९८ टक्के म्हणजे जवळपास दुप्पट पाऊस झाल्याने महापालिका क्षेत्रातील, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत. सध्या जिल्ह्यात येलो आणि ग्रीन अलर्ट मिळाला असून तात्काळ यंत्रणांनी खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

First Published on: July 15, 2022 9:45 PM
Exit mobile version