मोबाईल मॅप वापरणे पडले महागात, कळसुबाईला निघालेल्या तरूणाचा मृ्त्यू

मोबाईल मॅप वापरणे पडले महागात, कळसुबाईला निघालेल्या तरूणाचा मृ्त्यू

मोबाईल मॅप वापरणे पडले महागात, कळसुबाईला निघालेल्या तरूणाचा मृ्त्यू

हल्ली कुठेही जायचे असेल तर कोणाला रस्ता विचारण्यापेक्षा सोपा सरळ मार्ग म्हणजे मोबाईलवरील मॅप. मॅपच्या मदतीने सगळे रस्ते न विचारता शोधता येतात. मात्र हाच मोबाईलवरील मॅप तीन तरूणांच्या जिवावर बेतला आहे. कळसूबाईकडे ट्रेकसाठी निघालेल्या पुण्यातील तीन तरूणांवर मोबाईलच्या मॅपमुळे मोठी दुर्घटना ओढावली. कळसुबाईच्या दिशेने जाण्यासाठी त्यांनी मोबाईलवर मॅपच्या सहाय्याने जाण्यास सुरूवात मात्र मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कळसुबाईकडे निघालेले तीन तरूण नदीच्या पाण्यात वाहून गेले. पाण्यात डूबून एका तरूणाचा मृत्यू झाला. तिन्ही तरूण हे पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणारे होते. सतीश सुरेश घुले, गुरूसत्य राजेश्वर राक्षेकर, समीर अलोलकर अशी तीन तरूणांची नावे आहेत. यातील सतीश घुले याचा मृत्यू झाला.

पुण्यात राहणारे तीन तरूण कळसुबाई शिखरावर निघाले. मॅपने त्यांना कोतूळवरून रादूर मार्ग दाखवण्याऐवजी चुकीचा मार्ग दाखवला. तिनही तरूण कोतळूहून अकोल्याच्या दिशेने निघाले. या मार्गावर मुळा नदीचा जुना पुल आहे. पिंपळगाव खांड धरण पूर्णपणे भरल्यामुळे हा पुल पाण्याखाली वाहून गेला. ड्रायवरला वाटले पुलावर जास्त पाणी नसावे त्याने पुलावरून गाडी नेली. थोड्याच अंतरावर गेल्यावर गाडी पुलावरून धरणाच्या पाण्यात पडली. रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. धरणाच्या पाण्यात तिन्ही तरूण वाहून गेले. त्यातील दोघांना पोहता येत असल्याने दोघे सुखरूपपणे बाहेर पडले. मात्र एक तरूण पाण्यात वाहून गेला.

बचावलेल्या दोन तरूणांनी बाहेर येताच मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. गावातील लोक त्यांच्या आवाजाने मदतीसाठी धावून आले. वाहून गेलेल्या एका तरूणाचा त्यांनी शोध घ्यायला सुरूवात केली. सकाळी साडे आठ पर्यत गावकरी तरूणाचा शोध घेत होते. त्यांच्या शोधमोहिमेला यश आले आणि गाडीसह त्या मृत तरूणाला बाहेर काढण्यात आले. तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने धोकादयक असलेल्या पुलावर सुचना फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचे तिथल्या ग्रामस्थांचे मत आहे.


हेही वाचा – नगर जिल्ह्यात आगळावेगळा निसर्ग विवाह

First Published on: January 11, 2021 8:03 AM
Exit mobile version