vel amavasya : मराठवाड्यात ‘वेळ अमावस्ये’चा उत्साह; वेळ अमावस्या म्हणजे काय, कशी साजरी होते?

vel amavasya : मराठवाड्यात ‘वेळ अमावस्ये’चा उत्साह; वेळ अमावस्या म्हणजे काय, कशी साजरी होते?

vel amavasya 2022: मराठवाड्यात 'वेळ अमावस्ये'चा उत्साह; वेळ अमावस्या म्हणजे काय, कशी साजरी होते?

भारत कृषीप्रधान देश असल्याने देशात शेतीशी संबंधीत अनके सण, उत्साव साजरे होतात. यातीलचं एक सण म्हणजे वेळ अमावस्या. मराठवाड्यात दरवर्षी या सणाचा एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भागात साजरा होतो. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. (vel amvasya)

या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात. (people celebrate amvasya) तिला गोडाधोडाचा नैवद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटत असतात. वेळ अमावस्येला बोली भाषेत येळवस असेही म्हटले जाते. यावेळी शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसेच रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी देवीकडे प्रार्थना केली जाते.

वेळ अमावस्या म्हणजे काय?

पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला वेळ अमावस्येचा उत्सव होतो. ही सातवी अमावस्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. यावेळी रब्बी हंगामातील पेरणी होऊन शेत पूर्ण हिरव्यागार पिकांनी डोलत असतं. यावेळी बोचणारे ऊनही नसते. मात्र ही वेळ अमावस्या केव्हा सुरु झाली याची नोंद नाही. वेळ अमावस्येच्या दिवशी लातूरमध्ये रस्त्यांवर कर्फ्यूसारखे वातावरण असते.

वेळ अमावस्या हिवाळ्यातच का साजरी होते?

उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू म्हणून हिवाळा मानला जातो. आयुर्वेदानुसार, हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. त्यामुळे तब्येतही तंदुरुस्त राहते. या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडं आणि रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या दिवसांत दूध, तूप, दहीस लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामुळे वेळ अमावस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थ्यांची घरोघरी एक मेजवानी असते. त्य़ामुळे दूरवरून लोकं लातूरमध्ये वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी येत असतात.


SulliDeals : केंद्र सरकारचे समर्थकच ‘सुल्ली डिल्स’ सारखी पोर्टल चालवतात, नवाब मलिकांचा आरोप


First Published on: January 2, 2022 1:03 PM
Exit mobile version