घरमहाराष्ट्रSulliDeals : केंद्र सरकारचे समर्थकच 'सुल्ली डिल्स' सारखी पोर्टल चालवतात, नवाब मलिकांचा...

SulliDeals : केंद्र सरकारचे समर्थकच ‘सुल्ली डिल्स’ सारखी पोर्टल चालवतात, नवाब मलिकांचा आरोप

Subscribe

गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे आणि पत्रकारांचे काही फोटो अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “इंटरनेटवर अशाप्रकारचे पोर्टल केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे काही समर्थक चालवत आहेत. त्यांनी काही बोर्ड, ट्रोल आर्मी  निर्माण केली आहे. या सर्व कामासाठी केंद्राची पाठराखण आहे. यावरून कोणाचे दुमत होऊ शकत नाही.” असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र लिहून आरोपींविरोधात कारवाई करत अटक करण्याची मागणी करणार असल्य़ाचे त्यांनी सांगितले आहे. आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणावे की, “सुल्ली डिल्स नावाचे एक ऑनलाईन पोर्टल आहे. त्या पोर्टलवर महिलांचे फोटो वापरुन बदनामकारक उद्योग या देशामध्ये सुरु आहेत. त्यात बहुतांश अल्पसंख्यांक समाजाच्या मुली आहेत. ज्या समाजात काही चुकतं घडत असेल तर स्पष्टपणे आपलं मतं मांडतात. मात्र कुठेतरी या मुलींची बदनामी करण्याचे काम या पोर्टलच्या माध्यतातून सुरु आहे. या घटनेची आम्ही निश्चित रुपाने निंदा करतोय. मी स्वत: याप्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे.”

- Advertisement -

“जे कोणी आरोपी हे पोर्टल चालवत असतील तर त्यांना अटक झाली पाहिजे. कारण यात मुंबईतील काही मुली आहेत. त्यांच्याबाबतीत हे काय नव्याने घडतं नाही यापूर्वीही अशाच काही पोर्टलच्या माध्य़मातून असे सगळे उद्योग सुरु होते. महिलांची अब्रू धुळीला मिळवण्यासाठी त्यांचे फोटो पोर्टलवर टाकणे यापेक्षा मोठा गुन्हा होऊ शकत नाही.” असंही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र लिहून संबंधीत प्रकरणातील आरोपींवर कारवाई करत अटक करण्याची मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची पत्रकारांची माहिती, फोटो इंटरनेटवरील बुल्ली बाई (Bulli Bai) नावाच्या अॅपवर अपलोड करुन बदनामी केली जातेय. प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली आहे, तर अनेक महिलांनी देखील या सोशल मीडिया अकाऊंटविरोधात सायबर पोलिसांत तक्रार केली आहे.अलीकडेच सुल्ली डिल्स (Sulli Deals) नावाचा असाच एक प्रकार उघडकीस आला होता.

- Advertisement -

SulliDeals नंतर BulliBai अ‍ॅपने मुस्लिम महिला, पत्रकारांना केले टार्गेट, तक्रारीनंतर मुंबई, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -