परीक्षेचा पॅटर्न ठरला, या पध्दतीने होणार अंतिम वर्षाच्या परीक्षा!

परीक्षेचा पॅटर्न ठरला, या पध्दतीने होणार अंतिम वर्षाच्या परीक्षा!

लवकरच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांसह पालकांनाही हाच प्रश्न होता की या परिक्षा पार तरी कशा पडणार. याचं उत्तर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब  मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिलं आहे. याच पद्धतीने सर्व विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहेत.

परिक्षा ५० मार्कांची तर वेळ एक तासाचा असणार आहे. अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

परीक्षांसाठी तीन पर्याय

अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरू आहे. ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस या तीन पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. या तीन पर्यायांपैकी प्रत्येक विद्यापीठ एक पर्याय निवडणार आहे. प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार आहे.

कशी असेल परीक्षा?

१. परीक्षेत ६० प्रश्न असतील. त्यातील ५० प्रश्न सोडवणं आवश्क आहे. प्रत्येक प्रश्न १ मार्कासाठी एक तासाच वेळ आहे.

२. ५० मार्क इंटर्नल, ५० मार्क एक्सटर्नल

३. १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर इंटर्नल परीक्षा, तर १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व विषयाची ऑनलाईन परीक्षा आणि निकाल. १ नोव्हेंबरला नवे प्रवेश प्रक्रिया सुरू होतील. १० नोव्हेंबरला ऑनलाईन शिकवणी सुरू होईल. मोबाईल आणि कॉम्प्युटर असलेले ९० टक्के विद्यार्थी आहेत.

त्याचबरोबर ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत त्यांना MKCL मार्फत परीक्षा देता येणार. कोविड किंवा अपघात जखमी असेल तर MKCL त्यांची परीक्षा घेण्याची व्यवस्था करेल. १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक व १ ते ३१ ऑक्टोबर परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अभ्यासक्रम वेळापत्रक लवकर अवगत करणे.


हे ही वाचा – पुण्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा, अजित पवारांची कबुली!


First Published on: September 5, 2020 9:00 PM
Exit mobile version