व्हिप कारवाईतून आदित्य ठाकरेंना वगळलं, १४ आमदारांना नोटीस

व्हिप कारवाईतून आदित्य ठाकरेंना वगळलं, १४ आमदारांना नोटीस

विधानसभेचे आज दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले. काल भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. तर आज बहुमताने विश्वासदर्शक ठराव देखील मंजूर केला. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गट यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना शिंदे गट व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या १४ आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर लक्षात घेऊन आम्ही माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव अपात्रतेसाठी दिलेले नाही, तसेच यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले म्हणाले.

भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यावरून आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेच्या इतर १४ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आदर लक्षात घेता कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये. त्यामुळे इतर आमदारांवर नेमकी कोणत्या प्रकारची कार्यवाही होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, राज्याच्या विधानसभेत एकीकडे शिंदे फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठराव १६४ बहुमताने जिंकत असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेना पक्षप्रमुख हेदेखील पक्ष बांधणीसाठी सक्रिय झाल्याचे दिसले.


हेही वाचा : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता


 

First Published on: July 4, 2022 9:51 PM
Exit mobile version