NCCच्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण : वडेट्टीवारांनी केलेली कारवाईची मागणी शासनाकडून मान्य

NCCच्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण : वडेट्टीवारांनी केलेली कारवाईची मागणी शासनाकडून मान्य

ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCCच्या विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण केल्याप्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यात या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या वतीने महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन देखील करण्यात आलं. दरम्यान, या मारहाण प्रकरणाचा मुद्दा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित करत कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांची मागणी शासनाकडून मान्य करण्यात आली.

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. एनसीसीच्या हेडने या विद्यार्थ्यांना शर्ट काढून चिखलात बेदम मारहाण केली. एनसीसीचा हेड इतक्या निर्दयीपणे कसा काय मारू शकतो? विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी आपण काही कडकर शासत करत असतो. पण काठी घेऊन आणि शर्ट काढून विद्यार्थ्यांना चिखलात बेदम मारहाण करायची, हा नेमका कुठला प्रकार आहे. हा निंदनीय प्रकार आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणी निवेदन देऊन कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. यासंदर्भात राज्य सरकार संपूर्ण चौकशी करून कडक कारवाई करणार, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – तलावांत 78 टक्के पाणीसाठा; मुंबईकर अद्यापही पाणी कपातीच्या सावटाखाली

या व्हिडीओत नेमकं काय?

विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयाच्‍या प्रांगणात साचलेल्‍या पाण्‍यात हात आणि पाय टेकवून आडवे करण्‍यात आले आहे. वरिष्‍ठ विद्यार्थी हातात लाकडी दांडका घेऊन उभा आहे. हा वरिष्‍ठ विद्यार्थी त्‍यांना लाकडी दांडक्‍याने अमानुष मारहाण करतांना दिसत आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की, विद्यार्थी अक्षरश: कळवळतांना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नकोच असे म्हणत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचे जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


हेही वाचा : NCCच्या विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण; ठाणे कॉलेजमधील धक्कादायक व्हिडीओ


 

First Published on: August 4, 2023 1:15 PM
Exit mobile version