घरठाणेNCCच्या विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण; ठाणे कॉलेजमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

NCCच्या विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण; ठाणे कॉलेजमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Subscribe

ठाणे : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी यापुढे असे होणार नाही, याची खबरदारी म्हणून एक कमिटीची स्थापना तत्काळ केली जाणार असल्याचे सांगितले आहे. ज्या विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये, तसेच त्यांनी एनसीसी सोडण्याचा विचार करू नये. याप्रकरणी त्या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (NCC students beaten with bamboo Shocking video from Thane college goes viral)

हेही वाचा – तलावांत 78 टक्के पाणीसाठा; मुंबईकर अद्यापही पाणी कपातीच्या सावटाखाली

- Advertisement -

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याचदरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येत असतात. मात्र ही शिक्षा अमानवी प्रकारची असल्याची धक्कादायक बाब व्हायरल व्हिडीओमुळे समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नकोच असे म्हणत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचे जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यात राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुचित्रा नाईक म्हणाल्या की, एनसीसीचे हेड हे सिनियर विद्यार्थीच असतात, ते कोणी शिक्षक नसतात. मात्र हा अंत्यत घृणास्पद असा प्रकार झाला आहे. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊ नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये, आम्हाला येऊन भेटावे, एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असेही नाईक यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -