शिर्डीचे साईमंदिर दर्शनासाठी राहणार रात्रभर खुलं

शिर्डीचे साईमंदिर दर्शनासाठी राहणार रात्रभर खुलं

 

आज विजयादशमी म्हणजेच दसरा. आज देशभरात दसऱ्याचा उत्साह असून शिर्डीतील साईबाबांचा १०१ वा पुण्यतीथी सोहळा आज साजरा होत आहे. हा सोहळा विजयादशमी आणि १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या चार दिवसापासून सुरू असून सोमवारपासून या उत्सवास सुरूवात झाली आहे. आज या उत्सवाचा दुसरा दिवस आहे. या निमित्ताने हाजारो भाविकांची रिघ असल्याची पाहायला मिळत आहे. याकरिता साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे.

असं सजलं आहे साईंच मंदिर

विजयादशमीच्या दिवशी १९१८ साली साईबाबांनी समाधी घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी शिर्डीत पुण्यतीथी उत्सव साजरा करण्यात येतो. शिर्डीमध्ये वर्षभरात मुख्य तीन उत्सव साजरे केले जातात. यामध्ये गुढीपाडवा, रामनवमी आणि विजयादशमी अशा सणांचा समावेश आहे. या तीनही उत्सवात साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत असते. आजही हजारो भाविक शिर्डीत उपस्थित झाले असून एकच उत्साह शिर्डीत सध्या आहे. साईमंदिर फुलांनी आणि सुंदर विद्यूतरोषणाईने सजवण्यात आले आहे.

अशा कार्यक्रमांची शिर्डीमध्ये रेलचेल

शिर्डीमध्ये आज पहाटे काकड आरतीने या मुख्य उत्सवाला सुरूवात झाली आहे. साईबाबांचा आराधना विधी, भिक्षा झोळी यासारख्या विविध कार्यक्रमांची रेलचेल आज शिर्डीमध्ये असणार आहे. १०१ वा पुण्यतीथी सोहळा आणि विजयादशमीच्या निमित्ताने साईंच्या दर्शनासाठी हजारो भक्त शिर्डीत दाखल होत असल्याने सर्वांना साईंचे आज दर्शन घेता यावे यासाठी साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

First Published on: October 8, 2019 1:10 PM
Exit mobile version