विक्रमगडमध्ये ‘मेगा ऑक्सिजन टॅंक’ घोटाळा – किरीट सोमय्या

विक्रमगडमध्ये ‘मेगा ऑक्सिजन टॅंक’ घोटाळा – किरीट सोमय्या

३१ डिसेंबरपर्यंत आणखी ४० घोटाळे लोकांच्या समोर आणणार, सोमय्यांचा अमरावतीमधून इशारा

मुख्यमंत्र्यांच्या पालघर दौऱ्याला काही दिवस उलटतात तोच किरीट सोमय्याही आज मंगळवारी विक्रमगड, पालघर दौरा केला. विक्रमगड आणि पालघरमध्ये मेगा ऑक्सिजन टॅंक घोटाळा झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनेक रूग्णांचे सदोष ऑक्सिजन पुरवठ्याच्या सिस्टिममुळे मृत्यू झाल्याचे किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारमार्फत काही महिन्यांपूर्वी ऑक्सिजन सिस्सिट बसविण्यात आली. पण ही सिस्टिम सुरू झाली नसल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोरोना काळातला हा एकप्रकारचा घोटाळा असल्याचे किरीट सोमय्या यांनी केला आहे.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच पालघर जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात पालघर जिल्ह्यातील आरोग्याचा विषय हा दुर्लक्षित राहिल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले होते. त्यासोबतच पालघर जिल्ह्यासाठी यापुढच्या काळात सातत्याने आरोग्य आणि दळणवळणाच्या तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच दौऱ्यापाठोपाठ लगेचच भाजपचे माज खासदार किरीट सोमय्या यांनी पालघर दौऱा केला. या दौऱ्यात आरोग्य यंत्रणेतील उणीवा किरीट सोमय्या यांनी समोर आणल्या आहेत. पालघर येथील विक्रमगडमध्ये असलेले रेविरा कोविड हॉस्पिटलमध्ये मेगा ऑक्सिजन टॅंक स्कॅम असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या हॉस्पिटलची क्षमता २०० कोरोना रूग्ण ठेवण्यासाठीची होती. तर हॉस्पिटलमध्ये आयसीयू पेशंटची क्षमता ही ५० आहे. या हॉस्पिटलमध्ये सदोष ऑक्सिजन पुरवठा सिस्टिममुळे नुकसान होऊन, रूग्णांचे मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत काहीच महिन्यांपूर्वीच हे ऑस्किजन सिस्टिम बसविण्यात आली होती. परंतु अद्याप ही ऑक्सिजन यंत्रणा पूर्ववत होऊ शकली नाही. म्हणूनच या कोरोना घोटाळ्याची मागणी व्हायची गरज आहे अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.


 

First Published on: February 16, 2021 4:11 PM
Exit mobile version