Virar Fire : आगीची घटना दुर्दैवी, चौकशीअंती सत्य समोर येईल – बाळासाहेब थोरात

Virar Fire : आगीची घटना दुर्दैवी, चौकशीअंती सत्य समोर येईल – बाळासाहेब थोरात

Virar Fire : आगीची घटना दुर्दैवी, चौकशीअंती सत्य समोर येईल - बाळासाहेब थोरात

विरारमधील विजय वल्लभ रुग्णलयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रुग्णालयात एसीचा स्फोट झाल्याने आग लागली या आगीमध्ये १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या रुग्णालयाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली आहे. रुग्णलयात आग लागून १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना दुःखद आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात येतील तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या चौकशीत दोषी आढळल्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब यांनी म्हटले आहे की, परवा नाशिकमध्येही ऑक्सिजन सिलेंडरचा टॅंक लीक झाल्यामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आता विरारमध्ये आग लागल्यामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ऑडिट करण्यात येईल. भंडाऱ्यातील रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर राज्यात सर्वत्र फायर ऑडिटच्या सूचना देण्यात आल्या होत्या यामध्ये विरारमध्येही फायर ऑडिट करण्यात आले असेल असे महसूल मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

या रुग्णालयात पहाटेच्या वेळी आग लागली आहे. एसीचा ब्लास्ट झाल्याने आग लागली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एसीचा ब्लास्ट होण्याची घटना पहिलीच आहे. याबाबच चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून काळजी घेण्याबाबत मुद्दे घेण्यात येतील. तसेच काय काय काळजी घेण्यात येईल याच्या सूचनाही मागितल्या जातील. राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणांवर ताण आला आहे. पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातील व्यवस्था पाहत आहेत. परंतु दुर्दैवाने अशा घटना घडत असतात अशा घटना घडणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

विरोधकांकडून राजकारण करण्याचे काम

देशात कोरोना परिस्थिती आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला पत्र लिहून कोरोना संदर्भात सूचना आणि विनंती केली परंतु केंद्र सरकारने थट्टा आणि राजाकारण केले. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करण्यामध्ये राजकारण करत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

First Published on: April 23, 2021 5:53 PM
Exit mobile version