मतदान करा पेट्रोल, डिझेलवर सूट मिळवा

मतदान करा पेट्रोल, डिझेलवर सूट मिळवा

पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात

मतदान करणाऱ्या ग्राहकांना पेट्रोल डिझेलमध्ये ५० पैशाची सूट देण्याची घोषणा इंडिया पेट्रोलियम डिलर्रस असोसिएशन ने केली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक जनजागृतीपर मोहीप राबवल्या जात आहेत. देशभरातील अनेक सेवाभावी संस्था पथनाट्य, जाहिरात, सोशलमीडियाच्या माध्यमातून लोकांनी मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून न साजरा करता जागृक नागरिक म्हणून मतदानात सक्रिय सहभाग नोंदवावा यासाठी आव्हाहन करत आहेत. अशातच आता इंधनावर मतदान करणाऱ्या ग्राहकांना सुट देत या अभियानात ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन सुद्धा सहभागी झाले आहे.

पहिल्यांदाच सवलत

मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने घरा बाहेर पडावे आणि मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, यासाठी ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशन ही सूट ग्राहाकांना देत आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत मतदान केलेल्या ग्राहकांसाठीच ही सवलत असणार आहे. यासाठी मतदान केल्याची हातावर शाई दाखवावी लागणार आहे. एआयपीडीएचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. २० लीटर पर्यंतच्या इंधनावरच ही सूट दिली जाणार आहे. त्यापेक्षा जास्त इंधन भरल्यास ही सवलत मिळणार नाही. पेट्रोल पंपाच्या डिलर्सकडून ही सवलत मिळणार आहे.

९० टक्के डीलर्सचा सहभाग

देशात एकूण ६४ हजार पेट्रोल पंप असून, ५८ हजार पेट्रोलियम डीलर्स आहेत. आतापर्यंत ९० टक्के डीलर्सनी ही सवलत देण्यास होकार दिला आहे. अनेक सिने अभिनेते, क्रिकेटर्स, सेलिब्रेटी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करत आहेत. मतदानाच्या तारखा जाहिर होण्याआधी देखील आयोगाकडून मतदान नोंदणी अभियान, मतदान यादीत नाव आहे की नाही पडताळुन पाहण्यासाठी १९५० हा टोल नंबर आयोगाकडून देण्यात आला आहे.

 

First Published on: April 6, 2019 1:51 PM
Exit mobile version