कोकणवासीयांची ‘वाट’ मोकळी, अटी शिथील!

कोकणवासीयांची ‘वाट’ मोकळी, अटी शिथील!

ऑगस्ट महिना सुरू झाला आणि चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे वेध लागले. पण राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढत जाणारी संख्या बघता. कोरोना परिस्थितीमुळे गावाकडे येण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत. पण आता रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांना विना पास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई, पुण्याप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यंदा कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. या आधी कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाइन पाळणे बंधनकारक होते. मात्र आता या सर्व अटी शिथील करण्यात आल्या आहेत.

प्रवेशासाठी पासाची गरज नाही

ज्या चाकरमान्यांकडे पास नाही अशा चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कशेडी घाटात असलेले कडक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे. याआधी विनापरवानगी घेऊन जिल्ह्यात येण्यास बंदी होती. पण, आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. सध्या चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे रत्नागिरीमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

First Published on: August 2, 2020 1:56 PM
Exit mobile version