वानखेडे मैदान ताब्यात घेणार असल्याचं वृत्त खोटं – महापालिका आयुक्त

वानखेडे मैदान ताब्यात घेणार असल्याचं वृत्त खोटं – महापालिका आयुक्त

यंदाच्या आयपीएल मॅचवर दहशतवाद्याचं सावट? वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांकडून रेकी

क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेतलं जाणार असल्याचं गेले दोन दिवस बोललं जात होतं. मात्र, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेतलं जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडिअमला भेट देत मैदानाची पाहणी केली होती.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईतील कोणतंच मैदान ताब्यात घेतलं जाणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, वानखेडे परिसरातील नागरिकांनी मैदानात क्वारंटाइन सेंटर उभारण्यास विरोध केला होता. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी असा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. इक्बाल सिंग चहल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “वानखेडे ताब्यात घेतलं जाणार असल्याच्या बातम्या पाहून मलाच आश्चर्य वाटलं. जर खुली मैदानं क्वारंटाइन सेंटरसाठी घेतली आणि पाऊस पडला तर चिखल होईल. चिखल झाल्यानंतर खूप अडचणी निर्माण होतील. आपल्याजवळ मोठं पार्किंग आहे ते वापरु शकतो. मैदानात एवढं मोठं मंडप उभारु शकत नाही. त्यामुळे असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि कोणतंही मैदान ताब्यात घेतलं जाणार नाही.”


हेही वाचा – पेन्शनबाबत बँकेला दिल्या नव्या सूचना, ज्येष्ठांना मिळणार दिलासा


शिवाय, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअमसोबत ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात घेतलं जावं अशी मागणी केली होती. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना हे शक्य नसल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की, “आपण स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंटाइनसाठी कठीण पृष्ठभूमीवर व्यवस्था करणे शक्य आहे.”

दरम्यान, मुंबईत डबलिंग रेट म्हणजेच रुग्ण दुप्पट होण्याचा दर १४.५ झाला असून ही दिलासादायक बातमी असल्याचं इक्बाल सिंग चहल म्हणाले. इक्बाल सिंग चहल यांनी यावेळी लॉकडाऊन वाढवला असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. लॉकडाऊन वाढवला आहे तर सर्व नागरिकांनी आतापर्यंत जेवढं सहकार्य केलं आहे, मदत केली आहे ती वाया जाऊ देऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं.

 

First Published on: May 17, 2020 4:54 PM
Exit mobile version