वर्ध्यातील कंपनीला म्यूकर मायकोसिस इंजेक्शन उत्पादनाची परवानगी, दिवसाला २० हजार इंजेक्शन बनवणार

वर्ध्यातील कंपनीला म्यूकर मायकोसिस इंजेक्शन उत्पादनाची परवानगी, दिवसाला २० हजार इंजेक्शन बनवणार

वर्ध्यातील कंपनीला म्यूकर मायकोसिस इंजेक्शन उत्पादनाची परवानगी, दिवसाला २० हजार इंजेक्शन बनवणार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोना आपले नवे रुप धारण करुन अधिक वेगाने पसरत आहे. कोरोनाविरोधात लढाई सुरु असताना आता म्युकर मायकोसिस हा काळ्या बुरशीचा आजारही रुग्णांना जखडत आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना म्यूकर मायोकोसिस आजार होत आहे. या आजारावरील इंजेक्शन महाग आहे. या इंजेक्शनची निर्मिती वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये करण्यासाठी एफडीएने परवानगी दिली आहे. याच कंपनीमध्ये सध्या रेमडेसिवीरीचे इंजेक्शन तयार करण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच म्यूकर मायकोसिस हा काळ्या बुरशीचा रोगही पसरत आहे. हा रोग भयंकर असून यामध्ये रुग्णांच्या डोळ्यावर परिणाम होतो तसेच परिणामी जास्त आजार झाल्यावर डोळे निकामी होण्याची आणि रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. या रोगावर देण्यात येणारे एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन हे ७ हजार रुपये आणि अधिक दराने विकले जात आहे.

काळ्या बुरशी जन्य म्युकर मायकोसिस आजार असलेल्या रुग्णाला एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन हे ४० ते ५० एकाच व्यक्तीला द्यावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या आजारावरील इंजेक्शनचा भाव परवडणारा नाही. यासाठी राज्यात उत्पादन घेण्यासाठी एफडीएने परवानगी दिली आहे. हे इंजेक्शन वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये तयार करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला होता अखेर त्याच्या पाठपुराव्याला पुन्हा यश आले आहे.

वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत काळ्या बुरशीजन्य रोग असलेला म्युकर मायकोसिस प्रतिबंधक एम्फोटेरीसीन बी इंजेक्शनचे उत्पादन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या हे एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन ७ हजार आहे. आणि एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शनची आवश्यकता आहे. यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात इंजेक्शन तयार करण्यात येत आहे. वर्ध्यात तयार होणारे इंजेक्शन हे अवघ्या १२०० रुपयामध्ये रुग्णाला मिळणार आहे. तसेच दिवसाला २० हजार इंजेक्शन बनवण्यात येणार असल्याचे जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे या इंजेक्शनची राज्यात निर्मिती करण्यात येत आहे.

First Published on: May 14, 2021 10:05 PM
Exit mobile version