MIMचे वारिस पठाण बरळले, म्हणे ‘आजादी छीन के लेनी पडेगी’!

MIMचे वारिस पठाण बरळले, म्हणे ‘आजादी छीन के लेनी पडेगी’!

वारीस पठाण

एकीकडे सीएए आणि एनआरसीवरून देशभरात वातावरण तणावपूर्ण झालेलं असताना एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये केलेल्या धक्कादायक वक्तव्यावरून वादंग निर्माण झाले आहे. गुलबर्गामध्ये झालेल्या सभेमध्ये वारिस पठाण यांनी ‘आम्ही १५ कोटी असलो, तरी १०० कोटींवर भारी आहोत’, अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. तसेच, ‘आझादी मिळत नसेल, तर हिसकावून घ्यावी लागेल’, असंही ते म्हणाले. दरम्यान, कर्नाटकमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे या वक्तव्यावर कर्नाटक सरकार काय कारवाई करणार? हा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

नक्की काय म्हणाले वारिस पठाण?

‘ईंट का जवाब पत्थरसे देना सीख लिया है हमने. बस साथ में चलना पडेगा. आजादी लेनी पडेगी, अगर मांगने से नहीं मिलती तो छीनकर लेनी पडेगी. आम्हाला म्हटलं गेलं, आया-बहिणींना पुढे केलं (शाहीन बाग आंदोलन), पण त्यांना सांगेन की आत्ता फक्त वाघिणी बाहेर पडल्या आहेत, तितक्यात तुम्हाला घाम फुटला. जर सगळे बाहेर पडलो, तर काय होईल? आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींवर भारी आहोत, हे लक्षात ठेवा’, असं वारिस पठाण यावेळी स्टेजवरून म्हणाले.

जर वारिस पठाण यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी मी माफी देखील मागेन. पण त्याआधी दिल्लीत भाजपच्या नेत्यांनी ‘गोली मारो सालों को’ या केलेल्या वक्तव्यावर काय कारवाई झाली? त्यांनी माफी मागितली का? याचं आधी उत्तर द्या.

इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम

First Published on: February 20, 2020 4:31 PM
Exit mobile version