ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! ठाणे शहरात ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! ठाणे शहरात ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

On August 12 about 50 percent less water supply will be provided to Thane Municipal Corporation

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उथळसर प्रभाग समिती अंतर्गत जेल जलकुंभाची इनलेट जलवाहिनी ही के-व्हीला नाला येथील पूल प्रकल्पाच्या कामात ५०० मिमी व्यासाची इनलेट जलवाहिनी बाधित होत आहे. त्या बाधित होणाऱ्या जलवाहिनी स्थलांतरीत करण्याच्या कामाला येत्या शनिवारी ६ मे रोजी सुरु होत आहे. त्यामुळे त्या इनलेट जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्याच्या काम हाती घेतल्याने सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत असा १२ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

या शटडाऊन कालावधीत उथळसर प्रभाग समितीमधील जेल जलकुंभ अंतर्गत श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी १, राबोडी २, पंचगंगा, आकाशगंगा, के-व्हीला परिसर, पोलीस लाईन, टेंभीनाका, सिव्हील हॉस्पिटल, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, धोबी आळी व उथळसर परिसर इत्यादी भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी.

तर महापालिकेमार्फत या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने ठाणेकर नागरिकांना केले आहे.


हेही वाचा : ४० आमदारांसह वजीर गायब होणारा होता पण… शिंदे गटातील आमदाराची राष्ट्रवादीवर टीका


 

First Published on: May 4, 2023 9:13 PM
Exit mobile version