पालघरमध्ये पाण्याची टाकी कोसळली

पालघरमध्ये पाण्याची टाकी कोसळली

पालघर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील हरणवाडी येथील परिसरात असणारी पिण्याच्या पाण्याची टाकी अचानक कोसळली. ही टाकी कोसळल्याने गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मात्र ही टाकी कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. रात्रीच्या वेळेस ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. ही पाण्याची टाकी कोसळण्यापुर्वी तेथील जवळच तीन लोक उभे होते. मात्र ते या  घटनेमध्ये बचावले आहेत.

२६ गावांना पाणी पुरवठा करण्याच्या क्षमतेची टाकी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजने अंतर्गत माहीम ग्रामपंचायतीच्या हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ही पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. संपुर्ण पालघर तालुक्यातील २६ गावांना पाणी पुरवठा करण्याची क्षमतेची ही टाकी होती. २०१२-२०१३ साली पालघर येथील हरणवाडी येथे ८० हजार लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली होती.

अचानक रात्रीच्या वेळी टाकी कोसळली

या टाकीतून नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता त्यावेळी अचानक रात्री १० वाजेच्या सुमारास टाकी कोसळली. आज बुधवारी सकाळच्या वेळी टाकीत पाणी चढविण्यासाठी आलेल्या उपसरपंच नरोत्तम राऊत यांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी तत्काळ संबंधितांना कळवले.  दरम्यान, ५-६ वर्षांपूर्वीच या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे ही टाकी कोसळली असल्याने याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

First Published on: July 10, 2019 2:47 PM
Exit mobile version