सत्ता गेली चुलीत, त्याची आम्हाला काही पर्वा नाही; बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा

सत्ता गेली चुलीत, त्याची आम्हाला काही पर्वा नाही; बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा

सत्ता गेली चुलीत, त्याची आम्हाला काही पर्वा नाही, आम्ही एवढे ताकदवान आहे की, 20 वर्षे साडे तीनशे गुन्हे घेऊन फिरतो असा शब्दात अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी आपला आक्रमकपणा दाखवला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा वादावर उत्तर देण्यासाठी आज अमरावतीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होते. या मेळाव्यात बोलताना त्यांनी सत्तेची पर्व नाही म्हणत आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही, गेलो तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशाराच  दिला आहे. यावेळी बच्चू कडू यांनी एक शायरी देखील म्हणून दाखवली. (We dont care if power is gone mla Bachu Kadu Aggressive over maharshtra political crisis ravi rana shinde fadanvis govt)

प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही

बच्चू कडू म्हणाले की, मला शेर पसंत आली ती म्हणजे, जली तो आग कहते है बुझी को राख कहते, जिस राख से बारुद निकलती हो उसे प्रहार कहते है… प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, एक वार प्रहार दहा तुकडे करण्याची ताकद आमच्यात आहे. आम्ही दिसायला जरी कमी असू, तो जो आहे ना तो बाजी आहे तानाजी आहे. जिथे असून तिथून वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. मैदानात आले तर मैदानात , सेवेमध्ये आले तर सेवेमध्ये, रक्तदानात आले तर रक्तदानात, तलवारीत आले तर तलवारीमध्ये सुद्धा आम्ही कमी पडत नाही.

… तर कोथळा काढल्याशिवाय राहत

आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही, गेलो तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड माराल तर तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात बच्चू कडूंनी थेट आव्हान दिले आहे. बाकीचे नेते लढ म्हणतात, आणि बच्चू कडू स्वत: लढतात, हा फरक आहे दोघांमध्ये… मी असं लढ म्हणाऱ्यांपैकी नाही. हम तो खुद आ जाते है मैदान मै…. आम्ही सैनिकासारखं जगतो, फिर विचार करत नाही. गर्दी महत्त्वाची आहे आणि इथे सगळे दर्दी आहे, म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली.

मी जेव्हा निवडणुकीला बाहेर पडलो, तेव्हा कोणत्या बिल्डराच्या घरी गेलो नाही. नातं गोत सांगत फिरलो नाही. धर्म, मंदिर, मशीद, आणि पुतळ्याची पुजा करत बसलो नाही. घराच्या बाहेर पडवल्यावर अपंगांच्या आंदोलनासाठी उभा राहिलो. वेळी आली तेव्हा ट्रेन, बसने गेलो. गोरगरीब, अपंगांसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, त्यांचा कधी राजकारणासाठी वापर केला नाही. असही बच्चू कडू म्हणाले.

आम्ही छोटा पक्ष असलो, तरी दिलदार आहोत. नाव बच्चू असलं आणि आडनाव कडू असलं तर मी गोड आहे. कितीही खाल्लं तर मधूमेह होत नाही. आज सर्वच पक्षात बंडखोर आहेत. जे बंडखोर आहेत, तेच पहिल्या रांगेत आहेत. जेवढी प्रसिद्धी मला मीडियाने गेल्या काही दिवसांत दिली, तेवढी मला शेतकरी आंदोलनादरम्यान दिली असती, तर पाच-सहा मागण्या मी पूर्ण करून दाखवल्या असत्या असही बच्चू कडू म्हणाले.


दिल्लीच्या नरेलामध्ये प्लास्टिक फॅक्टरीला भीषण आग; दोघांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

First Published on: November 1, 2022 3:12 PM
Exit mobile version