Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

नोव्हेंबर महिना उलटला तरी अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली नाही. या अवकाळी पावसाची मुसळधार अनेक राज्यात सुरुच आहे. दरम्यान, बुधवारी १ डिसेंबरला २४ तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.दरम्यान, लक्षव्दीप मालदीवजवळ चक्रीवादाळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या द्रोणीय भागामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात याचा प्रभाव जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचा फटका मुंबई आणि उपनगरातील काही भागांनाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याशिवाय राज्यातील पालघर, नंदुरबार धुळे या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक व्यवसायांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.याशिवाय अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 


हे ही वाचा – Omicron : महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमीवर जाहीर कार्यक्रमास बंदी, राज्य सरकारची नवी नियमावली


 

First Published on: November 30, 2021 6:19 PM
Exit mobile version