Weather Alert: राज्यात वीकेंडमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Weather Alert: राज्यात वीकेंडमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Weather Update : राज्यातील नागपूर, वर्ध्यासह चार जिल्ह्यांत पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात मागील काहीदिवसांपासून विदर्भ,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरी पडत आहेत. पश्चिम महाराष्ट्राला अनेक जिल्ह्यांत गारांच्या पावसाने झोडपले आहे. तसेच राज्यात वीकेंडलाही पाऊस हजेरी लावणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणा आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. १ मे व २ मेला राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन राज्यात १ व २ मेला वादळीवाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रात मराठावाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

तसेच आज मराठवाडा, सातारा, नंदुरबार या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात सातारा जिल्ह्यात अनेक वेळा गारपीठीसह पाऊस पडला आहे. त्यामुळे साताऱ्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात पाऊस पडणार असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांची खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. सातारा, कोल्हापूर, पुण्यात शुक्रवारी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तेथील वातावरण अजूनही ढगाळ असून पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आले आहे.

First Published on: May 1, 2021 5:27 PM
Exit mobile version