महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला, मात्र इतर राज्यांत कडाका

महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला, मात्र इतर राज्यांत कडाका

पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र दिसतेय, मागील दोन दिवसांपासून राज्यातील थंडीचा पारा कमी झाला आहे. यात अनेक शहरातील तापमान वाढ असल्याने गारठा कमी झाला आहे आणि काहीसा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात थंडीचा जोर कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. *weather forecast alert cold wave beginning of december will be cloudy the temperature will increase and the cold will decrease in maharshtra madhya pradesh)

पुण्यात गेल्या आठवड्यात पारा 10 अंशांच्या खाली पोहचला होता तो आता 15 अशांच्या घरात नोंदवला जात आहे.
त्यामुले राज्यातील बहुतांश जिल्ह्यात डिसेंबर महिन्याची सुरुवातचं ढगाळ वातावरणाने होणार असून थंडीची तीव्रता घटेल. त्यानंतर राज्यात थंडीची लाट येऊ शकते. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राज्यातील वातावरण ढगाळ असेल.

राज्यात गुरुवारी किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअसवर पोहचले होते, ते पुढील आठवड्यात 15 अंश सेल्सिअसपुढे जाणार आहे. दरम्यान राज्यात 18 नोव्हेंबरपासून किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढत होता. यात नाशिक, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली होते. विशेषत; जळगाव जिल्ह्यात सलग 8 दिवस तापमान 10 अंशांखाली होते.

उत्तरेतील राज्यात थंडीचा कडाका अधिक वाढला आहे. यात बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून वाहवारे वारे सर्वात आधी उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करतात. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात अधिक थंडी जाणवते. यात ढगाळ वातावरणामुळे या वाऱ्यांची तीव्रता कमी होईल ज्यामुळे पुढील आठवड्यात किमान तापमानात वाढू शकते. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात जरी थंडीचा जोर जाणवत नसला तरी राजधानी दिल्ली, मध्य प्रदेश, बिहारमध्ये आठवड्याभरापासून थंडीने कहर केला आहे. दिल्लीत शुक्रवारी गेल्या दोन वर्षांतील सर्वात थंड सकाळ अनुभवता आली. यात हवामान खात्याने आता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागात बर्षवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे लखनऊसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये तीन ते चार दिवस वातावरण ढगाळ राहणार असून थंडीचा प्रकोप वाढण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. यासह मध्यप्रदेशात पुढील ४८ तासांसाठी कोल्ड वेब अलर्ट जारी केला आहे.


Vastu Tips : दुर्भाग्य दूर करण्यासाठी आजपासूनच करा पितळेच्या भांड्याचे ‘हे’ उपाय

First Published on: November 26, 2022 8:12 AM
Exit mobile version