हिवाळ्यानंतर पावसाळा? हवामान विभागाचा मुंबई, पुण्यात असा अंदाज

हिवाळ्यानंतर पावसाळा? हवामान विभागाचा मुंबई, पुण्यात असा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, थंडी अजूनही कायम आहे.

Mumbai Pune Weather Update : सृष्टीच्या ऋतूचक्रात उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा…पण यंदाच्या वर्षी उन्हाळ्यानंतर पावसाळा असंच म्हणावं लागेल. फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर देशात उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. पण यावर्षीय फेब्रुवारी महिन्यात हिवाळ्यानंतर पावसाळाच पहायला मिळणार आहे. हवामान विभागाने तशी माहिती दिली आहे. थंडी आता निरोप घेण्याच्या मार्गावर असली तरी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

वातावरणातील किमान तापमानात घट झाल्याने महाराष्ट्रात थंडीचा कहर पहायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट आहे. पुढील ३ दिवस राज्यासह मध्य भारतातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, थंडी अजूनही कायम आहे. उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट नोंदवली आहे. ४८ तासांनंतर किमान तापमानात आणखी २ ते ३ अशांनी घट होईल, असा अंदाज आहे. ४-५ दिवसांनंतर किमान तापमान साधारण २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरातही थंडीचा जोर कायम आहे. पुढील काही दिवसांमध्ये पुण्यातील तापमान अंशत: कमी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

पुण्यासह मुंबईमध्येही थंडीची हुडहुडी वाढली आहे. त्यामुळं नागरिकांनी शेकोट्या पेटवत उबदार कपडे घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि कोकणात अचानक थंडी वाढली आहे. त्यामुळं पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हवामान बदलत आहे. गेल्या २४ तासात अंशतः ढगाळ आकाश दिसेल. सोमवारी हवामान खात्याने सांगितले की, अधूनमधून हलका पाऊस आणि बर्फवृष्टी सकाळी सुरू राहील आणि दुपारनंतर त्यात सुधारणा होईल. आता खोऱ्यात हवामान बदलत आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीत घट झाली आहे. सध्या आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सोमवारी, हवामान खात्याने खोऱ्यात हलका पाऊस आणि हिमवृष्टी केली आहे. “जम्मू आणि काश्मीरमध्ये आज दुपारपर्यंत मधूनमधून हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल आणि त्यानंतर परिस्थिती सुधारेल,” असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

First Published on: February 7, 2023 11:04 AM
Exit mobile version