weather warning : नागरिकांनो काळजी घ्या! मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

weather warning : नागरिकांनो काळजी घ्या! मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

weather warning : नागरिकांनो काळजी घ्या! मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यात मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात आजपासून पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. तर मुंबई, पालघर, ठाण्यात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पावसाची संतत धार सुरु आहे. यात मुंबईत आज सकाळपासूनच काही भागांमध्ये रिमझिम पाऊस बरसतोय. परंतु आजपासून पुढील ४ दिवस पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आजपासून पुढीस पाचही दिवस पावसाची मुसळधार सुरुच राहणार आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्हांनाही मुसळधार पाऊस झोडपून काढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुंबई, ठाणे, पालघर, कोकणातील नागरिकांनी काळजी घ्या.

 नागरिकांनी काळजी घ्या

हवामान खात्याचे हवामान तज्ज्ञ के.एस.होसळीकर यांनी ट्विट करुन आगामी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. होसळीकर यांनी म्हटले आहे की, आयएमडीने कोकण, मुंबई, पालघरसह ठाण्यात येत्या ५ दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतर भागांतही मुसळधार पाऊस बरसणार आहे.

त्यामुळे ११ ते १५ जून २०२१ कोकण, मुंबई, ठाणे, पालघरच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तर अनेक भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.


ट्विटरने उमर खालिदच्या अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’हटवली


 

First Published on: June 11, 2021 3:41 PM
Exit mobile version