त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर; SIT स्थापन करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर; SIT स्थापन करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

What happened in Trimbakeshwar temple is serious Home Minister Devendra Fadnavis order to set up SIT

त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरुन वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसचं, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघाने केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याकरता एसआयटी स्थापना करण्याचे आदेश गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ( What happened in Trimbakeshwar temple is serious Home Minister Devendra Fadnavis order to set up SIT )

नेमकं प्रकरण काय?

13 मे 2023 रोजी रात्री 9:30 ते 10 या वेळेत श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महादरवाजा येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणूकीतील काही इतर धर्मीय व्यक्तींनी उत्तर महादरवाजा येथून समस्त हिंदूधर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट अत्यंत गंभीर असून वरील कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जिल्ल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महासंघाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसचं असे प्रकार भविष्यात होणार नाही यांची दक्षता घ्यावी, अशी विनंती या पत्रातून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे.
एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

या कथित घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचेसुद्धा आदेश दिले आहे. ही एसआयटी केवळ या वर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनाचीही चौकशी करेल. गेल्या वर्षी एका विशिष्ट जमावाने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील मुख्य प्रवेशद्वारातून आता शिरण्याचा प्रयत्न केला होता.

( हेही वाचा: विठुरायाच्या दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू द्यावे, वारकरी संघटनेची मागणी )
दर्ग्यात दरवर्षी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीवेळी मिरवणूक जेव्हा मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात, अशी अनेक वर्षांपासून परंपरा असल्याचं उरुसाचे आयोजकांनी म्हटलं आहे. त्यादिवशी सुद्धा धूप दाखवण्यासाठी आलो होते. त्यामुळे आमचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न नव्हता, असं दुसऱ्या बाजूकडून सांगण्यात आलं आहे.
First Published on: May 16, 2023 12:05 PM
Exit mobile version